जळगावात सुजाण पालकत्व कार्यशाळेचं आयोजन

जानेवारी 23, 2026 5:36 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा व स्थानिक केंद्र जळगाव आयोजित सुजाण पालकत्व कार्यशाळा दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार रोजी केमिस्ट भवन जळगाव येथे सकाळी 10 ते 5 दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे.

manshakti

मुलाचे मूळ व्यक्तिमत्व आणि पालकांकडून होणारे पोषण यांचा सुयोग्य मिळातून एक परिपूर्ण व्यक्तिमत्व साधायला पालकांकडून योजनाबद्ध प्रयत्न कशाप्रकारे व्हायला हवे याचे वैज्ञानिक व मानसशास्त्रीय मार्गदर्शन मनशक्तीचे जीवनदायी साधक मयूर चंदने व उमाताई चंदने यांच्याद्वारे होणार आहे. कार्यशाळेची वैशिष्ट्ये मुलांचा हट्टीपणा चंचलता उद्रेक आणि भावना कशा हाताळाव्यात याचे मार्गदर्शन, मोबाईल आणि गेम्स पासून मुलांना कसे प्रावृत्त करावे, मुलांच्या उजव्या डाव्या मेंदूचा समतोल विकास कसा करायचा.

जेन झी व अल्फा पिढी यांचे प्रॉब्लेम काय आहेत व त्याचे परिणाम काय होतील याचेही मार्गदर्शन होणार आहे. मुलांच्या बौद्धिक शारीरिक मानसिक क्षमता वाढीचा हा काळ वर्तनातले बदल आई-वडिलांच्या अपेक्षांचा ताण व बाह्य आकर्षण स्पर्धात्मक युगाचा ताण याचा शैक्षणिक प्रगती बरोबर स्वभाव व आरोग्याचा समतोल कसा साधायचा या अनेक समस्यांवर वैज्ञानिक मानसशास्त्रीय उपाय सांगणारे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन यासोबत माईंड गेम्स हा अभिनव गेम प्रकार कार्यशाळेसोबत असेल या खेळांद्वारे मुलांची निर्णय क्षमता एकाग्रता कल्पनाशक्ती तर्कशक्ती विकसित करून कशी वाढते याचे मार्गदर्शन या कार्यशाळेत केले जाईल. तरी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन स्थानिक केंद्र जळगाव तर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now