⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! महाराष्ट्रात मान्सून वेळेआधीच दाखल होणार

जळगाव लाईव्ह न्यूज |१९ मे २०२२ | तौक्ते चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालं असून यंदा वेळेआधीच मान्सूनचा पाऊस केरळ आणि महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, तौक्त चक्रीवादळामुळे देशातील वातावरणात बदल झाल्याचे पाहायला मिळाले असून यामुळे देशातील बर्‍याच राज्यांत मुसळधार पाऊस झाला. अजूनही काही भागांमध्ये पावसाची रिपरिप कायम आहे. अशात नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सूनचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून निश्‍चित तारखेच्या एक-दोन दिवस आधी केरळमध्ये दाखल होणार आहे. इतकंच नाहीतर यंदा मान्सूनचा पाऊसही चांगला असण्याची शक्यता आहे.

येत्या तीन ते चार दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे तर त्यानंतर केरळमार्गे प्रवास करत 8 जूनपर्यंत कोकणात पावसाचे आगमन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पावसाळ्याच्या आगमनाची पूर्व निर्धारित तारीख १ जून आहे, तर तो 31 मेपर्यंत केरळमध्ये पोचेल असा अंदाज आहे. भारतीय मान्सून प्रदेशात मान्सूनचा पाऊस दक्षिण अंदमानच्या समुद्रापासून सुरू होतो आणि मान्सूनचे वारे वायव्येकडून बंगालच्या उपसागराकडे जातात. अरबी समुद्रावर चक्रीवादळाची शक्यता लक्षात घेता, 20 मेपासून बंगालच्या उपसागरावर मान्सून खूप जोरदार होईल. 21 मे रोजी, मान्सून दक्षिण बंगालची उपसागर आणि अंदमान निकोबार बेटांना व्यापेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.