⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

अमळनेरच्या नागरिकांसाठी ‘गुड न्यूज’, जाणून घ्या काय सांगते बातमी!

Amalner News-जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । अमळनेर वासियांनो शासकीय जमिनी मालकी हक्काने‎ करून घेण्यासाठी शासनाने ८मार्च‎ २०१९ रोजी अधिनियम प्रसिद्ध केले‎ होते. त्याची मुदत ८ मार्च २०२२ला‎ संपली आहे. परंतु, प्रा. अशोक‎ पवार यांची मागणी व आमदार‎ अनिल पाटील यांचे पत्र तसेच‎ पाठ-पुराव्याने या अधिनियमाची‎ मुदत दोन वर्षांनी वाढलीय, म्हणजे ८ मार्च २०२४ पर्यंत‎ असणार आहे. त्यामुळे तुम्हाला शासकीय जमिनी मालकी हक्काने‎ करून घेण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळाली आहे.

या‎ संदर्भातील अर्ज जिल्हाधिकारी‎ यांच्याकडे करावा लागेल. यात‎ रहिवास प्रयोजनासाठी धारण‎ केलेल्या जमिनी, त्यात या‎ जमिनीच्या प्रचलित वार्षिक दर‎ विवरणपत्रातील दराप्रमाणे येणाऱ्या‎ किमतीच्या १५ टक्के एवढी रक्कम‎ भरावी लागेल. सवलतीचे दर ८‎ मार्च २०१९च्या अधिनियमात नमूद‎ केले आहेत. वाणिज्य, रहिवास व‎ सहकारी गृहनिर्माण या संस्थांना‎ देण्यात आलेल्या शासकीय जमिनी‎ म्हणजेच भोगवटादार दोन असून या‎ जमिनी भोगवटादार एकमध्ये‎ रूपांतरीत करता येणार आहेत. दरम्यान, नागरिकांच्या वतीने‎ आमदार अनिल पाटील यांचे नागरी‎ हित दक्षता समितीने आभार मानले‎ आहेत.

याप्रसंगी प्रा. अशोक पवार,‎ बन्सीलाल भागवत, डी. ए. धनगर,‎ एस. सी. तेले उपस्थित होते. या‎ सवलतीचा नागरिकांनी लाभ घ्यावा,‎ असे नागरिक दक्षता समितीच्या‎ वतीने कळवण्यात आले आहे.‎ दरम्यान, आमदार अनिल पाटील‎ यांच्या प्रयत्न तसेच पाठपुराव्यामुळे‎ मुदतवाढ मिळाल्याने नागरि हित‎ दक्षता समितीच्या सदस्यांसह‎ लाभार्थींनी आमदार पाटील यांचे‎ काैतुक केले आहे.‎