⁠ 
रविवार, मे 5, 2024

एरंडोलकरांसाठी गुड न्यूज : ताडे, खडकेसीम वीज उपकेंद्राला मंजुरी, मतदारसंघासाठी ५९ कोटी मंजूर

जळगाव लाईव्ह न्यूज । २० ऑगस्ट २०२२ । एरंडोल तालुक्यातील ताडे व खडकेसिम येथे 33 X11 चे विज उपकेंद्राच्या कामाला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. रिंगणगाव येथील वीज उपकेंद्राची क्षमता पाचएमव्हीए वरून दहा एमव्हीए करण्यात येणार असल्याची माहिती आमदार चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे रिंगणगाव परिसरातील गावांना विजेचा दाब चांगल्या प्रकारे उपलब्ध होणार आहे.

तसेच पुरवण्या मागण्यांमध्ये एरंडोल विधानसभा मतदार संघासाठी ५८कोटी ८० लाख रुपये मंजूर झाले आहेत. एरंडोल येथे नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ३कोटी रुपयाच्या निधीला मान्यता देण्यात आली. पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, आनंदा चौधरी, शालिग्राम गायकवाड, संभाजी पाटील, राजेंद्र पाटील, गोरख चौधरी, राजू महाजन, रवींद्र जाधव, चिंतामण पाटील हे होते. यावेळी एरंडोल तालुक्याच्या सिंचनासाठी व वीज समस्या सोडवण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी निधीच्या अक्षरशः पाऊस पाडला अशी भावना त्यांच्या समर्थकांनी व्यक्त करीत आमदार चिमणराव पाटील यांना शाल व पुष्पहार देऊन सन्मानित केले.

एरंडोल विधानसभा मतदार संघासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी एकूण 58 कोटी 79 लाख 69 हजार एवढा भरघोस निधी शासनाकडून मतदार संघाच्या विकास कामांसाठी ओढून आणला. त्यात एरंडोल तालुक्यासाठी 35 कोटी रुपये व पारोळा तालुक्यासाठी 18 कोटी 79 लाख 69 हजार एवढ्या निधीच्या समावेश आहे एरंडोल नगरपरिषद व शासकीय इमारत बांधकाम करण्यासाठी तीन कोटी रुपये व पारोळा नगरपरिषद हद्दीतील कॉलनी भागातील ओपन स्पेस मध्ये विविध ठिकाणी बगीचे विकसित करणे व सुशोभीकरणे या कामासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.

पुरवणी मागणी मंजूर कामे व त्यासाठी मंजूर झालेला निधी!
कासोदा गावातील भडगाव रस्त्यापासून उर्दू शाळा व मंदिरापर्यंत काँक्रिटीकरण करणे व तळई ते उत्राणदरम्यानची राहिलेली खराब लांबी डांबरीकरण करणे तीन कोटी रुपये.
सावदा गावातील एक किलोमीटर लांबी काँक्रिटीकरणासह डांबरीकरण करणे व खर्ची गावातील एक किलोमीटर लांबी काँक्रिटीकरणासह डांबरीकरण करणे व खर्ची गावाच्या पुढे ते म्हसावद रस्त्याला लागूनची एक किलोमीटर लांबी काँक्रिटीकरणासह डांबरीकरण करणे तीन कोटी रुपये.
हनुमंत खेडे ते उत्राण रस्त्याचे रुंदीकरणासह संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण करणे चार कोटी.
ताडे गावाच्या पुढे रुंदीकरण व डांबरीकरण- एक किलोमीटर दीड कोटी.
खर्ची गावाच्या पुढे अपघाती पुलाचे बांधकाम दोन कोटी.
नांदखुर्द ते परकांडे गावापर्यंत रस्ता डांबरीकरण 5/600 k.m चार कोटी.
गालापूर फाटा ते खडके व खडके ते वनकुटे एकूण सात किलोमीटर नवीन रस्त्याचे बांधकाम आठ कोटी दहा लक्ष.
निपाणे ते जवखेडे संपूर्ण रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण दोन किलोमीटर तीन कोटी.
नादखुर्द गावाजवळ अंजनी नदीवर मोठ्या पुलाचे बांधकाम सहा कोटी.
धरणगाव चौफुली ते टोळी गावापर्यंत फर्निचर बसवणे 20 लक्ष.
धरणगाव चौफुली ते टोळी गावापर्यंत फर्निचर बसवणे 20 लक्ष.