⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

मोठ्या भावाच्या श्राद्धाला लहान भावाचाही जगाला रामराम!

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ फेब्रुवारी २०२२ । जीवनाचा पूर्णविराम म्हणजे मृत्यू आपल्या जीवनप्रवासात मृत्यूच्या सोहळ्याला सर्वाधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. असाच मृत्यूचा सोहळाच जणू दोन भावांच्या परिवाराने अनुभवला. मोठ्या भावाच्या निधनानंतर १५ व्या दिवशी वही गायन दोघांमधील बंधूप्रेमाची चर्चा वाघोड परिसरात आहे. वाघोड जि.प. शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवचंद काशिनाथ सातव ( ९४ ) यांची १९ जानेवारी रोजी प्राणज्योत मालवली. ३ रोजी १६ दिवसांचे श्राध्द होते. त्याआधीच बुधवारी त्यांचे लहान बंधू व वहिगायक जगन्नाथ काशिनाथ सातव (८७) यांचे हृदयविकाराने निधन झाल.

वाघोड येथील देवचंद सातव, जगन्नाथ सातव व रघुनाथ सातव या तीनही भावांचा सुसंस्कृत व संस्कारीत असा परिवार, दोन्ही थोरल्या भावांच्या आधीच धाकटे बंधू सेवानिवृत्त मुख्याध्यापक रघुनाथ सातव यांचे अल्पशा आजाराने त्यांचे वर्ष दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यांच्या पश्चात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे पोलीस निरीक्षक जयवंत सातव व सामाजिक कार्यकर्ते गुणवंत सातव अशी दोन मुले.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवचंद काशिनाथ सातव यांची दि. १९ जानेवारी रोजी वार्धक्याने प्राणज्योत मालवली. ३१ रोजी उत्तरकार्य आटोपल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी त्यांचे १६ व्या दिवसाचे श्राध्द होते. त्याआधीच २ रोजी पहाटे ५ वाजता त्यांचे धाकटे बंधू जगन्नाथ सातव (वय ८७) यांचे हृदयविकाराने अकस्मात निधन झाले. पहाटे ४ वाजता स्नान करून भगवंताचे नामचिंतन करीत असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. रामायणातील प्रभुरामचंद्र लक्ष्मणाच्या माध्यमातून समाजमनात आजही भावाभावांमध्ये असलेले सौख्य प्रकट होतांना दिसून येते. किंबहुना, वाघोड गावात एकत्रित कुटूंब पध्दतीचा वारसा आजही समाजातील पुढारलेल्या अनेक परिवारांमध्ये आढळून येत आहे.

त्यांच्या पश्चात प्रगतशील शेतकरी मधुकर सातव, माध्यमिक शिक्षक सुनिल सातव, सामाजिक कार्यकर्ते सोपान व नामदेव सातव ही चार मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार

हे देखील वाचा :