जळगाव लाईव्ह न्यूज । २० एप्रिल २०२६ । सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अक्षय तृतीयाच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोबत चांदी देखील दर घसरला आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. Gold Silver Rate Today

सध्या लग्नसराईचे दिवस सुरु आहे. यातच काल जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत अक्षय्य तृतीयेच्या ३०९ रुपयांची किरकोळ झाल्याने सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५७,६९३ रुपयांपर्यंत खाली आले होते. सोमवारी सकाळी आणखी ८२४ रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,८६९ रुपयांपर्यंत घसरले.

दुसरीकडे आज चांदी दरातही घसरण झाली आहे. सोमवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ४१२० रुपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो २,६३,६८० रुपयांपर्यंत घसरले. यापूर्वी काल रविवारी चांदीत २०६० रुपयांची घट झाली होती.












