जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दरात वाढ दिसून आली. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा भाव घसरला आहे. ज्यामुळे नागरिकांना स्वस्तात सोने खरेदीची एक संधी उपलब्ध झाली आहे. एकीकडे सोने स्वस्त झाले असताना दुसरीकडे चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीयेत.

काय आहे १८, २२ व २४ कॅरेट सोन्याचा दर
गुड रिटर्न्स वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रती तोळा ५४० रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा दर ९८,२९० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे. जीएसटीसह हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला १ लाखांवर पैसे खर्च करावे लागणार आहेत. २२ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ५०० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्हाला आज ९०,१०० रुपये खर्च करावे लागतील.

तर १८ कॅरेट सोन्याचे दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी देखील आज कमी खर्च करावा लागणार आहे. १८ कॅरेट सोन्याच्या दरात प्रतितोळा ४१० रुपयांनी घट झाली असून हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला ७३,७२० रुपये खर्च करावे लागतील.
आजचा चांदीचा दर किती?
सोन्याच्या दरात वाढ झालेली असताना चांदीच्या दरात कोणतेही बदल झालेले नाहीयेत. यामुळे चांदीचा दर 1,10,000 रुपये प्रति किलोग्रॅम इतका कायम आहे.












