सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला ; आज किती रुपयांनी महागले, काय आहे नवीन दर?

ऑक्टोबर 6, 2025 11:24 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ ऑक्टोबर २०२५ । आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात मोठी वाढ झाली आहे. सोबतच चांदीचा दर देखील वधारला आहे. आजच्या दरवाढीनंतर सोन्याचा तोळा १ लाख २० हजाराच्यावर गेला असून सोन्याने पुन्हा नवा उच्चांक गाठला आहे.या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. जर तुम्हीही आज सोनं-चांदी खरेदी करायला सराफ बाजारात जाणार असाल तर त्यापूर्वी नवीन दर तपासून घ्या.. Gold Silver Rate Today

gold silver 1

खरंतर नवरात्री,दसऱ्यानंतर आता दिवाळी सण पंधरा दिवसांवर येऊन ठेपला आहे. दसऱ्यानंतर दिवाळीत अनेक जण सोने-चांदी खरेदी करतात. यंदा दसऱ्याआधीच विक्रमी पातळी गाठलेल्या सोने-चांदीचा दर दिवाळीपर्यंत कुठवर जाणार याकडे ग्राहकांचं लक्ष लागले आहे.दसऱ्यानंतर सोन्याचे दर कमी होतील अशी आशा ग्राहकांना होती. पण सोन्याचे दर वाढतच चालले आहे.

काय आहे सोन्याचा दर ?

गुड रिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, आज २४ कॅरेटच्या सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. २४ कॅरेटच्या १ तोळा सोन्याचे दर १,३७० रुपयांनी वाढले आहे. यामुळे आता २४ कॅरेटचे एक तोळा सोनं १,२०,७७० रुपयावर पोहोचले आहे. तसेच २२ कॅरेटच्या सोन्याच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. आज २२ कॅरेटच्या १ तोळा सोन्याच्या दरामध्ये १,२५० रुपयांनी वाढ झाली आहे. हे सोनं खरेदी करण्यासाठी आज तुम्हाला १,१०,७०० रुपये मोजावे लागणार आहे.

चांदीचा दर ?

दरम्यान, सोन्यापाठोपाठ चांदीला देखील चकाकी आली आहे. चांदीच्या दरात देखील चांगलीच वाढ झाली आहे. आज १ ग्रॅम चांदी १ रुपयांनी महागली असून ते खरेदी करण्यासाठी तुम्हाला १५६ रुपये खर्च करावे लागतील. तर आज १ किलो चांदीच्या दरामध्ये १००० रुपयांनी वाढ झाली असून ती खरेदी करण्यासाठी तुम्हाला १,५६,००० रुपये मोजावे लागणार आहेत. आज सोनं आणि चांदी दोन्ही खरेदी करताना ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now