सोने - चांदीचा भाव

सोनं-चांदी खरेदीची चांगली संधी ; नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मोठी घसरण, वाचा नवीन दर..

जळगाव लाईव्ह न्यूज । सोन्या-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेटच्या १० तोळे सोन्याच्या किमतीत ३ हजार ९०० रुपयांची घट झाली असून, एक किलो चांदीचा दरही ५ हजार रुपयांनी कमी झाला आहे. नवरात्रीच्या काळात मौल्यवान धातूंच्या किमतीत झालेल्या या घसरणीमुळे खरेदीदारांना दिलासा मिळू शकतो.

२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?

गुडरिटर्न्सने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याच्या दरात ३९० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे एका तोळ्याचा भाव १ लाख ४९ हजार २९० रुपये झाला आहे. तर १० तोळे सोन्याचा दर ३ हजार ९०० रुपयांनी कमी होऊन १४ लाख ९२ हजार ९०० रुपये झाला आहे.

२२ कॅरेट सोन्याचे दरही घसरले

दागिन्यांसाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या २२ कॅरेट सोन्याच्या दरातही घट झाली आहे. एका तोळ्यामागे ३५० रुपयांची घसरण झाल्याने दर १ लाख ३६ हजार ८५० रुपये झाला आहे. तर १० तोळे सोन्याचा भाव ३ हजार ५०० रुपयांनी कमी होऊन १३ लाख ६८ हजार ५०० रुपये झाला आहे.

१८ कॅरेट सोन्याच्या दरातही घट

२४ आणि २२ कॅरेट सोन्यापाठोपाठ १८ कॅरेट सोन्याचे दरही कमी झाले आहेत. एका तोळ्यामागे २९० रुपयांची घसरण झाल्याने १८ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ११ हजार ९७० रुपये झाला आहे. तर १० तोळे सोन्याचा भाव २ हजार ९०० रुपयांनी कमी होऊन ११ लाख १९ हजार ७०० रुपये झाला आहे.

एक किलो चांदी ५ हजार रुपयांनी स्वस्त

सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. एका ग्रॅम चांदीचा दर ५ रुपयांनी कमी होऊन २३५ रुपये झाला आहे. तर एक किलो चांदीच्या किमतीत ५ हजार रुपयांची घट झाली असून, किलोचा दर २ लाख ३५ हजार रुपये झाला आहे. सोन्या-चांदीच्या दरातील या घसरणीमुळे ग्राहकांना खरेदीची संधी मिळाली आहे. मात्र, प्रत्यक्ष खरेदी करताना स्थानिक सराफा बाजारातील दर, जीएसटी आणि घडणावळीचे शुल्क तपासून घेणे आवश्यक आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button