---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य सोने - चांदीचा भाव

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याची महागाईची गुढी ; जळगावच्या सुवणपेठेत आताचे असे आहेत भाव?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२५ । हिंदू धर्मातील नववर्षाचा सण गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर आला आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या दिवशी अनेकजण सोन्या-चांदीची खरेदी करत असतात. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार होत असताना गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याने महागाईची गुढी उभारली.

gold 6 jpg webp webp

जळगावच्या सुवर्णपेठेत सोन्यात सलग दुसर्‍या दिवशी मोठी वाढ झाली. यामुळे सोन्याने ९० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. सोने दरात या सोमवार आणि मंगळवारी घसरण झाली होती. मात्र आता बुधवार सोने प्रति तोळा १०० रुपयांनी तर गुरुवारी ६०० रुपयांनी वधारले आहे.

---Advertisement---

काय आहे सोन्याचा दर?
जळगाव सराफ बाजारात २२ कॅरेट सोने ८१,४९५ रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९०,६४० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. दुसरीकडे चांदी सोमवार, मंगळवारी दोन दिवस किंमती स्थिर होत्या. बुधवारी चांदी १००० रूपयांनी वधारली. तर गुरुवारी किंमती स्थिर होत्या. सध्या एक किलो चांदीचा दर १०१००० रुपये इतका आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment