जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२५ । सोने आणि चांदी दरात चढ उतार सुरु आहे. या आठवड्यात सलग दोन दिवस घसरण झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली. सोने दोन दिवसात अनुक्रमे 210 आणि 330 रुपये असे एकूण 540 रुपयांनी स्वस्त झाले.

मात्र बुधवारी सोने 110 रुपयांनी सोने वधारले.दुसरीकडे बुधवारी चांदी दरात तब्बल 1000 रूपयांची वाढ झाली. गुढीपाडवाच्या मुहूर्तापूर्वीच चांदीचे भाव वधारल्याने मुहूर्तावर सोने-चांदीचे भाव किती होतात, याकडे लक्ष लागलेले आहे. आता 22K, 24K सोन्याच्या तर एक किलो चांदीचा भाव जाणून घ्या…
गुडरिटर्न्सनुसार , बुधवारी झालेल्या दरवाढीनंतर आता 22 कॅरेट सोने 82,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 89,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर एक किलो चांदीचा भाव 1,02,000 रुपये इतका आहे.
जळगावातील भाव?
जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात तब्बल 2000 रुपयांची वाढ झाली. तर सोने भावात 100 रुपयांनी वधारले. चांदीचे दर 101000 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत तर सोन्याचे दर 88 हजार 300 रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.