पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनानंतर सराफ बाजारात मोठा बदल; सोन्याचा दर..

मे 11, 2026 2:28 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ मे २०२६ । इराण-अमेरिका युद्धामुळे भारतीय सराफ बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सतत चढउतार बघायला मिळत आहे. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना “किमान एक वर्ष सोने खरेदी करू नका” असे जाहीर आवाहन केले. पंतप्रधान मोदींच्या या आवाहनानंतर आज सोमवारी सकाळी सराफ बाजार उघडताच सोने दरात बदल दिसून आला.

gold modi

आज 11 मे 2026 रोजी सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. जळगावसह देशातील दिल्ली आणि मुंबईसारख्या अनेक शहरांमध्ये सोन्याच्या किमती घसरत आहेत. सतत सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहेत. त्यामध्येच पुन्हा एकदा सोन्याच्या किमतीमध्ये किंचित घसरण दिसून आलीये.

सोमवारी सराफा बाजार उघडताच जळगावात सोन्याच्या दरात प्रतितोळा ८०० रूपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. तर चांदीच्या दरातही प्रति किलो १ हजार रूपयांची कपात झाली आहे.

 जळगावच्या सुवर्णनगरीत २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा १ लाख ५० हजार रूपये इतकी झाली आहे. तर २२ कॅरेट सोन्याचे दर १ लाख ३७ हजार ४०० रूपये इतके झाले आहेत. तर चांदीची किंमत प्रति किलो २ लाख ५९ हजार इतक्या रूपयांवर आली आहे. 

दरम्यान,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैदराबाद येथे एका कार्यक्रमात भारतीयांना मोठे आवाहन करत पुढच्या एक वर्षापर्यंततरी सोने खरेदी करू नका असे म्हटले.तसेच पेट्रोल आणि डिझेलचा जपून वापर करा. अनावश्यक असेल तर विदेशात जाणे टाळावे, खाद्यतेलाचा वापर कमी करणे परकीय चलन वाचवण्यासाठी जनतेला एकजूट होण्याचे आवाहन केले. त्यामध्येच त्यांनी सोने न खरेदी करण्याचेही आवाहन केले. यामुळे भारतीय सराफा व्यापारावर याचा थेटपणे परिणाम होऊ शकतो.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now