जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२५ । आज गुढीपाडवा सण आहे. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडवा सणाच्या मुहूर्तावर अनेक जण सोनं-चांदी खरेदी करता. मात्र जळगावच्या सराफ बाजारात ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्यासह चांदी दराने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले आहे. आज सोनं-चांदी महागल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसणार आहे. तुम्हीही आज सोने चांदी खरेदीला जाणार असाल तर त्यापूर्वी जळगावच्या सराफा बाजारात आज सोनं-चांदीचे दर काय आहेत घ्या जाणून…

शनिवारी आंतरराष्ट्रीय बाजार बंद असताना भारतीय बाजारपेठेत गुढीपाडवा निमित्ताने मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात २०० रुपयांची वाढ झाली. यामुळे जळगावच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोने ८९९०० (जीएसटीसह ९२५९७) रुपयांवर पोहोचले आहे. सोन्याच्या या दराने आजपर्यंतचा उच्चांकी दर गाठला आहे. तर चांदीचा भाव १०,२००० रुपये प्रति किलोवर आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून सोने-चांदीचे भाव वाढत असले तरी जवळगावच्या सुवर्ण बाजारात खरेदीचा उत्साह कायम आहे. गुढीपाडवा सणाच्या दोन दिवस अगोदरच सोने ९२ हजारांच्या पुढे गेल्याने मुहूर्तावर भाववाढ होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. भारतात प्रत्येक सण, मुहूर्ताला महत्त्व दिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात सोने-चांदीची खरेदी होऊन राज्यात ५ कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काय भाव राहतात याकडे लक्ष असले तरी खरेदी मात्र जोरात होण्याचा अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी वर्तविला आहे.