ग्राहकांना दिलासा ! २४ तासात सोन्याचा चांदी दरात मोठी घसरण.. आता जळगावमध्ये दर काय?

ऑक्टोबर 4, 2025 12:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑक्टोबर २०२५ । जळगाव शहरातील सुवर्णबाजारात दोन आठवड्यांपासून भाववाढ होत असलेल्या चांदीच्या भावात शुक्रवारी घसरण झाली. सोबतच सोन्याचा दर देखील घसरला. गेल्या २४ तासात चांदी दरात एक हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी एक लाख ४६ हजार ५०० रुपयांवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ८०० रुपयांची घसरण होऊन ते एक लाख १७हजार ६०० रुपयांवर आले.

gold

नुकताच दसरा सण पार पडला असून यांनतर आता भारतात सर्वात मोठ्या सणांपैकी असलेल्या दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्यासह चांदी दरात मोठी उसळी दिसून आली. यानंतर आता आगामी दिवाळी आणि लग्नसराई सुरु होण्याआधी दोन्ही धातूंचे दर कमी होतील, अशी अपेक्षा ग्राहकांना आहे. यातच दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी जळगावात सोन्यासह चांदी दरात घसरण झाली.

चांदीमध्ये एक हजार रुपयांची घसरण झाली व ती १ लाख ४६ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली. तसेच सोन्याच्याही भावात ८०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख १७ हजार ६०० रुपये प्रति तोळ्यावर आले.

दरम्यान १७ सप्टेंबर रोजी चांदी दोन हजार रुपयांची घसरण होऊन एक लाख २८ हजार ५०० रुपयांवर आलेल्या चांदीच्या भावात १९ सप्टेंबरपासून भाववाढ सुरू झाली. सलग भाववाढ होत जाऊन २ ऑक्टोबरपर्यंत चांदी १ लाख ४७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचली. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी विक्री वाढविल्याने ३ ऑक्टोबर रोजी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now