जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोने दरात वाढ होताना दिसून आली. यामुळे सोन्याचे दर पुन्हा एकदा ८० हजार पार गेले असून चांदीचा भावही वधारला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. तर नव्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याच्या भावात किरकोळ घट झाल्याचं दिसून येतंय.
आजच्या दिवशी जर तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बाहेर पडणार असाल तर तुम्हाला किंचीत फायदा होण्याची शक्यता आहे. Goodreturns वेबसाईटनुसार, सोमवारी म्हणजेच आज १३ जानेवारी रोजी सोन्याचे दर घटले आहेत. 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 रूपये प्रति १० ग्रॅम इतकी घट झाली आहे. तर १० ग्रॅम सोन्याची किंमत 79,790 रूपये इतकी आहे. चीनची कमकुवत आर्थिक स्थिती हेदेखील सोन्याच्या किमती वाढण्याचं एक कारण असल्याचं सांगण्यात आलं आहे.
२२ कॅरेट सोन्याचा भाव काय?
२२ कॅरेट १ ग्रॅम सोनं आज 7,314 रुपयांना विकलं जात आहे.
२२ कॅरेट ८ ग्रॅम सोनं आज 58,512 रुपयांवर आहे.
१० ग्रॅम म्हणजे एक तोळा सोन्याचा भाव आज 73,140 रुपये इतका आहे.
२४ कॅरेट सोन्याचा भाव किती?
२४ कॅरेट १०० ग्रॅम सोनं 7,97,900 रुपये किंमतीने विकलं जातंय.
१० ग्रॅम सोन्याचा भाव आज 79,790 रुपये इतका आहे.
८ ग्रॅम सोन्याचा भाव आज 63,832 रुपये इतका आहे.
१ ग्रॅम सोनं 7,979 रुपयांनी विकलं जात आहे.
तुमच्या शहरातील भाव?
जळगाव
22 कॅरेट सोनं – 7,340 रुपये प्रति १ ग्रॅम
24 कॅरेट सोनं – 8,007 रुपये प्रति १ ग्रॅम
मुंबई
22 कॅरेट सोनं – 7,299 रुपये प्रति १ ग्रॅम
24 कॅरेट सोनं – 7,963 रुपये प्रति १ ग्रॅम
पुणे
22 कॅरेट सोनं – 7,299 रुपये प्रति १ ग्रॅम
24 कॅरेट सोनं – 7,963 रुपये प्रति १ ग्रॅम
नाशिक
22 कॅरेट सोनं – 7,343 रुपये प्रति १ ग्रॅम
24 कॅरेट सोनं – 8,010 रुपये प्रति १ ग्रॅम