जळगाव लाईव्ह न्यूज । ०९ जून २०२३ । जागतिक बाजारात मौल्यवान धातूच्या किमतीत घसरण झाल्याने देशांतर्गत बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालेला पाहायला मिळतोय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सकाळी सोन्यासह चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. मात्र गेल्या ट्रेडिंग क्षेत्रात चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचा भाव?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आठवड्याच्या शेवटच्या व्यहाराच्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा दर किंचित 25 रुपयांनी घसरला आहे. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 59866 रुपयांवर व्यवहार करत आहे. सोबतच चांदीचा दर 60 रुपयांनी घसरण असून एक किलो चांदीचा दर 73,610 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.यापूर्वी दोन दिवसापूर्वी चांदीचा दर 71,700 हजारावर होता. त्यात मोठी वाढ झालेली दिसून येतेय.
जळगावातील सोने चांदीचा दर
जळगावात सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 55,100 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. सोबतच चांदीचा प्रति किलोचा दर विनाजीएसटी 73000 रुपयावर गेला आहे. यापूर्वी दोन दिवसापूर्वी चांदीचा दर 71,500 रुपयांपर्यंत होता. त्यात मोठी वाढ झाली.
दरम्यान, गेल्या मे महिन्यापासून सोने-चांदीला कोणताही नवीन रेकॉर्ड करता आलेले नाही. सोन्याची आगेकूच थांबल्याने आणि चांदीतील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. फेब्रुवारी ते एप्रिल या तीन महिन्यात सोने-चांदीच्या जोरदार घौडदौडीने ग्राहकांचे तोंडचे पाणी पळाले होते. दरवाढीचा या दोन मौल्यवान धातूंच्या विक्रीवर मोठा परिणाम दिसून आला. विक्रीत घसरण दिसून आली होती. सध्या भाव 60 हजारावर आल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.
BIS Care APP
सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.