सोने-चांदीच्या किंमतीत पडझड सुरूच ; आता प्रति 10 ग्रॅमचा दर किती?

ऑगस्ट 9, 2023 10:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ ऑगस्ट २०२३ । सोने-चांदीच्या (Gold Silver Rate) किंमतीत पडझड सुरूच आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आलीय. तर या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी सोने-चांदीत किती पडझड होते की दर वाढतात हे संध्याकाळी स्पष्ट होईल. मात्र कालच्या सकाळच्या किमतीपेक्षा सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत देखील मोठी घसरण दिसतेय. Gold Silver Rate Today

gold 6 jpg webp

जळगाव सुवर्णनगरीमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएटी 54600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी 59,600 रुपायांवर गेला आहे. मंगळवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 60000 रुपयांवर होता. त्यात म्हणजेच 400 रुपयाची घसरण दिसून येत आहे. तसेच एक किलो चांदीचा दर 72000 रुपये इतका आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील (MCX) दर?
कमोडिटी एक्सचेंवर MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित 101 रुपयांनी वाढ होईल 59,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे 351 रुपयांनी वाढून 70,567 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now