Gold Silver Today : सोने घसरले, मात्र चांदी वधारली ; काय आहे आजचा दर? पहा..

ऑगस्ट 4, 2023 10:43 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । या महिन्यात सोन्याच्या किमती घसरताना दिसत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस सोन्याचा दर ६० हजारावर होता. तो आता खाली आहे. मात्र चांदीचा दर देखील घसरण असाल त्यात मोठी चढ-उतार सुरूच आहे. काल सकाळच्या बाजार भावापेक्षा आज सकाळी सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. मात्र, चांदी वाढलेली दिसून येत आहे.

gold silver rate jpg webp

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५४,६०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,७५० रुपयावर होता. म्हणजेच त्यात १५० ते २०० रुपयाची घसरण झाली.

तर सध्या २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,६०० रुपयावर आहे. काल सोन्याचा दर ५९७०० रुपयावर होता. त्यात १०० ते १५० रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे. मात्र दुसरीकडे चांदीचा दर वधारलेला दिसून येत आहे. सध्या चांदीचा दर विनाजीएसटी ७५,००० रुपये प्रति एक किलो इतका आहे. यापूर्वी चांदी ७४००० रुपयापर्यंत विकली जात होती. त्यात म्हणजेच १००० रुपयापर्यंतची वाढ झालेली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील (MCX) दर?
कमोडिटी एक्सचेंवर बाजाराच्या सुरुवातीलाच सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येत आहे. MCX वर आज सकाळी १०.३० वाजेपर्यंत सोने ऑक्टोबर फ्युचर्स (वायदे) किंचित ४४ रुपयांनी घसरून ५९ हजार ३८८ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. त्याचप्रमाणे चांदीचे सप्टेंबर वायदे २३७ रुपयांनी घसरून ७२ हजार २८५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now