Gold Silver Rate : सोने महागले, चांदी घसरली ; जाणून घ्या आजचे नवीन दर?

नोव्हेंबर 7, 2022 10:34 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । जागतिक बाजारातून कमकुवत संकेतमुळे सोन्याच्या (Gold Rate) किमतीत वाढ होताना दिसत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळच्या व्यवहाराच्या सत्रात सोन्याच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. मात्र दुसरीकडे आज चांदीच्या (Silver Rate) किमतीत घसरण झालेली आहे. आज सोमवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंज 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 80 रुपयापर्यंतची वाढ झाली आहे. तर चांदी 240 रुपयांनी घसरली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. Gold Silver Price Today

gold silver rate jpg webp

आज, वायदे बाजारात आज सकाळी 10 वाजेपर्यंत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 80 रुपयांनी वाढून 50,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. सोन्याचा दर आज 50,862 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर ते 50,860 रुपये झाले. मात्र, काही काळानंतर त्याला गती मिळाली आणि तो 50,940 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करू लागला. दुसरीकडे आज चांदीचा दर 240 रुपयांनी घसरून 60,300 रुपयांवर आला आहे.

सध्या देशात दिवाळी सण सरला असून आता लग्नसराईला सुरुवात झाली आहे. याकाळात सोने आणि चांदीला मोठी मागणी असते. दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. वायदे बाजारात गेल्या आठवड्यात सोने जवळपास 500 ते 600 रुपयांनी महागले आहे. तर दुसरीकडे चांदी तब्बल 2 हजार रुपयापर्यंत वधारली आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 24 कॅरेट सोन्याचा भाव 51000 रुपायांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदीचा भाव 60,000 रुपयापर्यंत आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now