⁠ 
गुरूवार, मार्च 28, 2024

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ ; खरेदीला जाण्यापूर्वी वाचा प्रति ग्रॅमचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ सप्टेंबर २०२२ । आज देशभरात दसरा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी ग्राहक अनेक वस्तूंची खरेदी करतात. घरात नवीन वस्तू, सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करतात. याच पार्श्वभूमीवर जर तुम्ही आज सोने-चांदीची खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला दरवाढीचा दणका बसणार आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. या वाढीमुळे जळगाव सुवर्णनगरीत सोने 52 हजारांवर गेले आहे. तर चांदी तब्बल 62 हजारांवर गेली आहे. Gold Silver Rate Today

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील सोने चांदीचा आजचा भाव?
दसरा निमित्त मोठ्या प्रमाणत दागिने खरेदी केली जाते. अशातच सोने आणि चांदीच्या भावात मोठी वाढ झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मागील काही सत्रात सोन्याच्या भावात घसरण दिसून आली. त्यामुळे सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव जवळपास जवळपास 51 हजाराच्या खाली होते. मात्र मंगळवारी सायंकाळी सोने भावात मोठी वाढ झालेली दिसून आली. सध्या मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 51,850 रुपयावर इतका आहे. तर चांदी 61,855 रुपये प्रति किलो इतका आहे.

जळगाव सुवर्णनगरीतील सोने चांदी भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात मोठी वाढ झालेली दिसून येतेय. एकाच दिवसात 24 कॅरेट सोन्याच्या भावात जवळपास 600 ते 700 रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय. त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. यापूर्वी सोन्याचा भाव 51,400 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. दुसरीकडे चांदीच्या भावात प्रचंड वाढ दिसून येतेय.

मागील काही दिवसापासून 57 ते 58 हजाराच्या घरात असलेली चांदी दसऱ्याच्या मुहूर्तावर 62 हजारावर गेली आहे. सध्या चांदीचा प्रति किलोचा भाव 62,000 इतका आहे. यापूर्वी चांदी 57,500 प्रति किलो इतका दर होता. मात्र एकाच दिवसात चांदीच्या भावात जवळपास 4000 ते 4500 हजार रुपयाची वाढ झालेली दिसून येतेय.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

दरम्यान, दसऱ्याला गेल्या वर्षापेक्षा दीडपट अर्थात ५० किलाे साेने विक्री हाेण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी कोरोनाचे सावट असताना दिवसाला १५ ते २० किलाे साेन्याची हाेणारी विक्री मागील वर्षी दसऱ्याला ३५ किलोच्या पुढे झाली होती. यंदा त्यात किमान दीडपट वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविला आहे.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.