⁠ 
सोमवार, नोव्हेंबर 25, 2024
Home | सोने - चांदीचा भाव | रामनवमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाला बदल ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव

रामनवमीच्या दिवशी सोन्याच्या किमतीत झाला बदल ; हा आहे आजचा 10 ग्रॅमचा भाव

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० मार्च २०२३ । मागील काही दिवसात उसळी घेतलेल्या चांदीच्या किमतीत स्थिरता दिसून येत आहे.मात्र दुसरीकडे सोन्याच्या किमतीत बदल होत असताना दिसून येत आहे. कालपेक्षा आज सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झालेली दिसून येत आहे. तर चांदी स्थिर आहे. तरी सोन्याचा दर ६० हजाराच्या घरात असून दुसरीकडे चांदी ७१ हजाराच्या घरात आहे. मात्र आगामी काळात सोने चांदीचे दरात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविली गेलेली आहे.

आजचा सोन्याचा दर
आज गुरुवारी सकाळी जळगाव सुर्वण नगरीत सकाळी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ५९,४५० रुपये इतका आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी सोन्याचा दर ५९,४०० रुपये प्रति तोळा इतका होता. म्हणजेच त्यात ५० रुपयाची किंचित वाढ झालेली आहे.

सोमवारी (२७मार्च) सकाळी सोन्याचा प्रति तोळ्याचा दर ५९,४०० तर मंगळवारी ५९,२०० रुपये असा होता. मात्र यंदाच्या दिवाळीत सोन्याचा दर ६५,००० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर चांदीची किंमतही ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते.

आजचा चांदीचा दर
चांदीच्या किमतीबाबत बोलायचे झाल्यास आज चांदीचा दर स्थिर आहे. आज सकाळी चांदीचा दर ७०,५०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. दरम्यान, यापूर्वी २ फेब्रुवारी रोजी चांदीने रेकॉर्ड केला होता. यादिवशी एक किलो चांदीचा भाव ७४,००० रुपयावर गेला होता. अजून हा रेकॉर्ड मोडायचा आहे.
(वरील सोने आणि चांदीचे दर GST सह इतर कर वगळून आहेत)

MCX वर सोन्याचा आजचा भाव
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. आज सोन्याचा भाव ११७ रुपयांनी घसरला असून तो ५८,९२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे मात्र चांदीच्या दरात वाढ झालेली आहे. आज चांदीचा दर १७७ रुपयांनी वाढला असून त्यामुळे चांदीचा ७०,७६१ रुपयावर व्यवहार करत आहे.

ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.