सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा घसरण, जळगावात दोन दिवसात चांदी 1800 रुपयांनी घसरली

सप्टेंबर 29, 2022 12:27 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ सप्टेंबर २०२२ । आंतरराष्टीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात झालेल्या घसरणीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून आला. मागील काही सत्रात सोन्याच्या भावात घसरण दिसून आलीय. दरम्यान, देशात नवरात्रोत्सवानंतर दसरा आणि दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर आहे. या निमित्ताने ग्राहकांची सोने-चांदी खरेदीसाठी (Gold-Silver Rate) रेलचेल सुरु असते. अशातच आज गुरुवारी पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरण झाल्याने ग्राहकांना सोने खरेदीसाठी चांगली संधी आहे. Gold Silver Rate Today

gold silver rate 2 jpg webp

आज सोन्याच्या दराबरोबरच चांदीच्या दरातही घसरण पाहायला मिळतेय. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर, 24 कॅरेट शुद्धतेचे सोने सकाळी 99 रुपयांनी घसरून 49,651 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे. सणासुदीचा हंगाम असून अशातच सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजमध्ये गुरुवारीही चांदीच्या घसरणीचा कल कायम राहिला.

आज चांदीचा भाव 502 रुपयांनी घसरून 56,020 रुपये प्रति किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 56,037 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढली, परंतु ही गती कायम राहिली नाही आणि मागणीतील कमकुवतपणामुळे किंमत 56,020 आले. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,074 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,300 रुपये इतका आहे. तसेच चांदीचा प्रति किलोचा दर 55,500 रुपये इतका आहे. यापूर्वी चांदीचा 56,000 रुपये इतक, तर मंगळवारी 56,800 रुपये इतका दर होता. दरम्यान, जळगाव गेल्या दोन दिवसात चांदीच्या भावात जवळपास 1700 ते 1800 रुपयाची घसरण झालेली दिसून येतेय.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now