Gold-Silver Rate : चालू आठवड्यात चांदी ३ हजारांनी स्वस्त, तर सोने? वाचा नवे दर

फेब्रुवारी 17, 2022 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ जानेवारी २०२२ । गेल्या अनेक दिवसापासून वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये काल आठवड्याच्या शेवटच्या ब्रेक लागला. जळगाव सुवर्ण नगरीत काल सोन्याच्या भावात तब्बल ९७० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ४९ हजार ०३० रुपये प्रति तोळावर आला. तर चांदीच्या भावात २ हजार १७० रुपयांनी घसरली. त्यामुळे चांदीचा भाव ६३ हजार ४०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.

gold silver

दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील मौल्यवान धातूंच्या किंमतीमधील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. सोन्याच्या दैनंदिन बाजारभावावर त्याचा परिणाम दिसून येत आहे.जळगाव सराफ बाजारात मागील काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याचा विचार केल्यास चांदीच्या दरात तब्बल ४१८० रुपयांनी वाढ झाली होती. तर सोने ६१० रुपयाने सोने महागले होते.

तर चालू आठवड्यात सोन्याच्या दरात किंचित ३०० रुपयापर्यंची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण दिसून आली. दरम्यान, सोने खरेदीकडे वाढता कल तसेच आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते.

या आठवड्यातील असे होते दर?

सोने दर :
२४ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३८० रुपये प्रति तोळा
२५ जानेवारी (मंगळवार) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२६ जानेवारी (बुधवारी) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२७ जानेवारी (गुरुवारी) ५०,००० रुपये प्रति तोळा
२८ जानेवारी (शुक्रवार) ४९,०३० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
२४ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२५ जानेवारी (मंगळवार) चांदीचा दर ६५,४६० प्रति किलो
२६ जानेवारी (बुधवारी) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२७ जानेवारी (गुरुवारी) चांदीचा दर ६५,५७० प्रति किलो
२८ जानेवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६३,४०० प्रति किलो

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now