---Advertisement---
सोने - चांदीचा भाव

उच्चांकापेक्षा सोने 800 रुपयांनी स्वस्त ; काय आहे आजचा प्रति 10 ग्रॅमचा दर?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२३ । सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार सुरूच असून आज सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण झालेली दिसून येत आहे. सोने सध्या 800 रुपयांहून अधिकने प्रति 10 ग्रॅमने त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त विकले जात आहे. यापूर्वी 13 एप्रिल 2023 रोजी सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला. त्यावेळी सोन्याचा भाव 61,300 रुपये (विनाजीएसटी) प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

gold silver jpg webp

जळगाव सुवर्ण नगरीमधील आजचा दर?
दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,500 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी काल सकाळी सोने 60,700 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका होता. त्यात आतापर्यंत 200 रुपयाची घसरण दिसून येत आहे.

---Advertisement---

दुसरीकडे आज चांदीच्या किमतीतही घसरण झालेली दिसून येत आहे. जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात चांदीचा एक किलोचा दर 74,500 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. यापूर्वी शुक्रवारी सकाळी 75,800 रुपये (विनाजीएसटी) इतका होता. म्हणजेच त्यात आतापर्यंत 300 रुपयाची घसरण झालेली दिसून येत आहे.

सोने चांदी आणखी महागणार?
दरम्यान, आगामी दिवाळीपर्यंत सोन्याचा प्रति तोळ्याचा दर 63000 ते 65,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे. सोबतच चांदीचा दरही नवीन उच्चांक गाठणार आहे. चांदी प्रति किलो 80000 हजार रुपयापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---