⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ, चांदीही महागली ; पहा आताच नवा दर?

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२३ । सोन्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. यासोबतच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात 250 रुपयांनी वाढ झाली आहे, तर चांदीच्या दरात 543 रुपयांची वाढ झाली आहे. यासह सोन्याचा भाव आता 61,000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. Gold Silver Price Today

MCX वरील आजचा सोने चांदीचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,159 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर चांदीचा एक किलोचा दर 74,383 रुपयांवर व्यवहार करत आहे.

जळगाव सुवर्ण नगरीमधील आजचा दर?
दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,700 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका आहे. यापूर्वी काल बुधवारी सकाळी 60,600 (विनाजीएसटी) इतका होता. त्यात आतापर्यंत 100 रुपयाची दरवाढ झालेली दिसून आहे. दरम्यान, आगामी दिवाळीपर्यंत सोने 63000 ते 65000 हजारापर्यंत जाण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविला आहे.

दुसरीकडे जळगावात चांदीचा एक किलोचा दर जवळपास 75,200 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. आगामी दिवाळीपर्यंत चांदीचा दर 80000 हजारापर्यंत जाणार असल्याचा अंदाज वर्तविला गेला आहे.

दरम्यान, गुरुपुष्यामृत आज गुरुवारी असून या दिवशी सोने खरेदी करणे, घर खरेदी करणे, मालमत्ता खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवशी लोक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात. मात्र सध्या सोन्याच्या किमतीने गाठलेल्या नवीन रेकॉर्डने ग्राहकांना घाम फोडला आहे.