चांदीच्या दर पुन्हा वधारला, सोने.. ; आजचे नवे दर तपासून घ्या?

एप्रिल 28, 2023 10:44 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ एप्रिल २०२३ । जागतिक बाजारात सोन्याचे भाव मजबूत होत असून, त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार सुरूच आहेत. दरम्यान, आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झालेली दिसून येतेय. यामुळे सोन्याचा भाव 60 हजाराखाली गेला आहे. मात्र, दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून येतेय. Gold Silver Rate Today

gold silver 5

MCX वरील सोन्याचा दर?
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याच्या दरात 75 रुपयांची घसरण झालेली दिसून येतेय. यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,826 रुपयावर व्यवहार करत आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यापेक्षा चालू आठवड्यात सोन्याच्या किमतीत घसरण झालेली दिसून येतेय. अक्षय तृतीयेच्या दिवशी सोन्याचा दर 61 हजारांवर होता तो आता खाली आला आहे

MCX वरील चांदीचा दर?
MCX वर सकाळी चांदीचा दर किंचित 60 रुपयांनी महागला आहे. यामुळे एक किलो चांदीचा दर 74,020 रुपयांवर व्यवहार करत आहे. दरम्यान, आगामी दिवाळीपर्यंत चांदीचा दर 80000 हजार रुपयाचा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

जळगाव सुवर्ण नगरीमधील आजचा दर?
दरम्यान, जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,700 (विनाजीएसटी) रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे आज चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसून येतेय. जळगावात चांदीचा एक किलोचा दर जवळपास 75,800 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. तो काल सकाळी 75,200 रुपये (विनाजीएसटी) इतका आहे. म्हणजेच एका दिवसात चांदी 600 रुपयांनी वधारली आहे.

अॅपद्वारे शुद्धता तपासा
तुम्हीही बाजारात सोने खरेदी करणार असाल तर हॉलमार्क पाहूनच सोने खरेदी करा. सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्ही सरकारी अॅप देखील वापरू शकता. ‘बीआयएस केअर अॅप’द्वारे तुम्ही सोन्याची शुद्धता खरी आहे की नकली हे तपासू शकता. याशिवाय तुम्ही या अॅपद्वारे तक्रारही करू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now