Gold Silver Today : सोने दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर ; वाचा आजचा प्रति 10 ग्रॅमचा भाव

सप्टेंबर 27, 2022 11:09 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ सप्टेंबर २०२२ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी आलेल्या घसरणीनंतर आज सोन्याच्या (Gold Rate) भावात किंचित वाढ दिसून आलीय. तर दुसरीकडे (Silver Rate) चांदीही महागलेली दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत किंचित १० रुपयांनी वाढली आहे. तर चांदी १३३ रुपयांनी महागली आहे. दरम्यान, आजही सोने दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर आहे. Gold Silver Today

gold silver jpg webp

MCX वर आजचा सोन्याच्या भाव :
आज आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी, सकाळी 11 वाजता MCX वर 24 कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत 10 रुपयांनी वाढून 49,160 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा दर आज 133 रुपयांनी वाढून 55,485 रुपये प्रतिकिलो इतकी आहे.

जळगावमधील दर
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,074 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,300 रुपये इतका आहे. यापूर्वी 22 कॅरेटचा भाव 45,258 रुपये इतका आहे. तर 24 कॅरेटचा भाव जवळपास 50,500 रुपये इतका होता. तसेच गेल्या सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,600, मंगळवारी 50,550, बुधवारी 50,600, गुरुवारी 50,500, शुक्रवारी 50,700, शनिवारी 50,100 असा होता. दरम्यान, दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर 56,800 रुपये इतका आहे. तो यापूर्वी 58,700 रुपये आहे. तसेच गेल्या आठवड्यात 57,000 रुपये इतका होता.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

पुढे काय होणार?
कमोडिटी तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मूलभूत आणि तांत्रिक आधारावर सोन्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. त्याचबरोबर काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, सणासुदीच्या हंगामामुळे दागिन्यांच्या क्षेत्रात जोरदार मागणीची अपेक्षा वाढली आहे. सोन्याचा भाव 50,000 रुपयांच्या खाली असल्याने विक्रीला निश्चितच चालना मिळेल, असे उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे. येत्या काही दिवसांत मागणी वाढल्यावर दर फारसे वाढणार नसून, 400 ते 500 रुपयांपर्यंत जाऊ शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now