जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । सराफ बाजारात सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) भावात चढ-उतार दिसून येत आहे. जळगाव सराफ बाजारात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरात किंचित घसरण दिसून आली. आज सोने ३० रुपयाने घसरले आहे. तर चांदी १० रुपयांनी स्वस्त झालीय.त्यापूर्वी गेल्या आठवड्यात व्यवहार बंद होण्यापूर्वी सोने ५० रुपयांनी स्वस्त झाले होते. तर चांदी १२० रुपयांनी महागली होती.

आज जळगाव सराफ बाजारात सध्या १० ग्रॅम सोने ४९,२५० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,७६० रुपये इतके आहे. गेल्या या आठवड्यात सोन्याचे दर कमी झाल्याचे दिसून आले आहे.मात्र दुसरीकडे चांदी दरात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले.

सध्या भारतासह १०० हुन अधिक देशांमध्ये ओमिक्राॅनचे रुग्ण आढळून आले आहे. ओमिक्राॅनचे रुग्ण वाढत असल्याने गुंतवणूकदार धास्तावले आहेत. नजीकच्या काळात पुन्हा निर्बंध लागण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोने आणि चांदीचे दर पुन्हा वाढू शकतात. जळगाव सराफ बाजारात गेल्या गेल्या आठवड्यात सोने ४ वेळा स्वस्त झालं आहे. तर दुसरीकडे चांदी २ वेळा स्वस्त तर तीन वेळा महागले आहे.
मागील आठवड्यातील सोने चांदीचे दर?
२० डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,७३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,५९० रुपये असा होता. २१ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६२,८६० रुपये इतका नोंदविला गेला. २२ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२५० रुपये इतका नोंदविला गेला. २३ डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३३० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,६५० रुपये इतका नोंदविला गेला. २४ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२८० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७७० रुपये इतका नोंदविला गेला.
हे देखील वाचा :
- ग्राहकांना मोठा दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; पाहा ताजे दर..
- जळगाव सराफा बाजारात मोठी उसळी! बाजार उघडताच सोने-चांदीत तब्बल इतक्या हजारांची वाढ?
- घसरणीला ब्रेक; बाजार उघडताच जळगावात सोने १,३३९ रुपयांनी, तर चांदी ६,१८० रुपयांनी महागली
- जळगावात सोने-चांदीचा भडका! चांदी ५ हजारांनी, तर सोने १,२०० रुपयांनी वधारले
- सुवर्णनगरीत दरांची घसरगुंडी! जळगावात सोने ५ हजारांनी तर चांदी १६ हजारांनी स्वस्त! नवीन दर काय?












