जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मार्च २०२५ । सोने आणि चांदीने सलग दुसऱ्या दिवशी ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आहे. सोन्याने 90 हजारांचा टप्पा ओलांडून माघार घेतली आहे.

जळगावच्या सुवर्णनगरीत गेल्या चोवीस तासात सोन्याच्या दरात एक हजार रुपयांची घसरण होऊन ९१००० हजार वरून सोन्याचे दर जीएसटीसह ९०,००० इतके झाले आहे. तर चांदीच्या दरात देखील दोन हजार रुपयांची घसरण होऊन चांदीचे दर १०१००० वरून ९९००० वर खाली आले आहेत.
दरम्यान, सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आगामी काळात अजूनही घसरण होण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने,ग्राहक सोने खरेदी कडे वेट अँड वॉच च्या भूमिकेत असल्याच पाहायला मिळत आहे
घसरणीमागील कारण?
डॉलरच्या तुलनेत वधारलेलां रुपया त्याच बरोबर रशिया आणि युक्रेन यांच्या मधे काही प्रमाणात निवळलेली युद्ध जन्य परिस्थिती याचा परिणाम म्हणून सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे.