सोने महाग तर चांदी स्वस्त, जन्माष्टमीला खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर?

ऑगस्ट 18, 2022 11:42 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ ऑगस्ट २०२२ । जागतिक बाजारात घसरण होत असली तरी आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र, आज सकाळपासूनच चांदीवर दबाव असल्याचे दिसून येत आहे. आज सोने महागले आहे. तर दुसरीकडे चांदी मात्र घसरली आहे. तुम्ही जर जन्माष्टमीला सोने-चांदी करत असाल तर चला जाणून घेऊयात काय आहेत आजचे भाव.. Gold Silver Rate Today

gold silver rate 2 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर, आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 149 रुपयांनी वाढून 51,652 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. यापूर्वी सोन्याचा व्यवहार 51,644 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने त्याची किंमत लवकरच 51,700 रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. सोने सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.29 टक्क्यांनी वाढले आहे.

तर दुसरीकडे आज सकाळी चांदीच्या दरात घसरण दिसून येत आहे. MCX वर, चांदीची किंमत 243 रुपयांनी घसरून 56,672 रुपये प्रति किलो झाली आहे. यापूर्वी, चांदीचा व्यवहार 56,655 रुपयांच्या पातळीवर उघडपणे सुरू झाला होता, परंतु मागणी वाढल्याने लवकरच त्याचे भाव 56,700 च्या वर गेले. चांदी सध्या मागील बंद किमतीच्या तुलनेत 0.27 टक्क्यांनी घसरत आहे.

सोने अजूनही जवळपास पाच हजार रुपये प्रति 10 ग्रॅम त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता.

महाराष्ट्रातील बड्या शहरातील दर
गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,९०० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५२,२५० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४७,९३० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२८० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५७६ रुपये आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now