⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

Gold Silver Rate Today : सोने चांदी पुन्हा वधारले ; खरेदीपूर्वी वाचा प्रति तोळा

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ मे २०२२ । गेल्या काही दिवसापासुन सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली होती. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशांतर्गत सोने-चांदीचे भाव पुन्हा वधारू लागले आहे. आज मंगळवारी जळगाव सुवर्ण नगरीत १० ग्रॅम सोन्याचे दर ३९० रुपयांनी महागले आहे. तर चांदीच्या दरात सलग दुसऱ्या मोठी वाढ झाली आहे. आज चांदीचा प्रति किलोचा दर १६३० रुपयांनी महागली आहे. त्यामुळे सोने पुन्हा ६२ हजारांवर गेले आहे. दरम्यान, यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात ३१० रुपयाची घसरण झाली होती. तर चांदी प्रति किलो ५९० रुपयांने महागली होती.

आजचा सोने चांदीचा भाव?
आजच्या दरवाढीनंतर सोने प्रतीताेळा ५१,४३० रुपायांवर आले आहे. तर चांदीचे दर प्रति किलो ६२,३५० रुपयांवर पोहोचले आहेत.दरम्यान, सोन्याचे दर दिवसांतून दोनदा बदलतात. त्यामुळे अनेकदा सोन्याच्या दरात तफावत आढळून येते.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सध्या लग्न सराईचा हंगाम सुरू आहे. लग्न समारंभात मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी होत असते. त्यातच आता जागतिक अर्थपटलावरील घडामोडींचा भारतीय बाजारपेठेवर मोठा परिणाम दिसून येत आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे तेजी-घसरणीचं चित्र दिसून येत आहे. बाजार अस्थिरतेमुळं गुंतवणुकदारांचा कल सोने गुंतवणुकीकडे पाहायला मिळाला.

त्यामुळे सध्या सोने पुन्हा वधारू लागले आहे. दुसरीकडे चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. दोन दिवसात चांदीच्या दरात २२०० ते २२५० रुपायची वाढ झाली आहे. तर दोन सोने किंचित ८० रुपयाने महागले आहे. काल सोने ३१० रुपयाने स्वस्त झाले होते. गेल्या आठवड्यात सोने जवळपास ७०० ते ७५० रुपयाची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात जवळपास ३६०० ते ३७०० रुपयाची घसरण झाली आहे. मात्र चालू आठवड्यात चांदी वधारताना दिसतेय.

गेल्या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
९ मे २०२२- रुपये ५२,५५० प्रति १० ग्रॅम
१० मे २०२२ – रुपये ५२,१५० प्रति १० ग्रॅम
११ मे २०२२ – रु ५२,७७० प्रति १० ग्रॅम
१२ मे २०२२- रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम
१३ मे २०२२- रु ५१,६३५० प्रति १० ग्रॅम

गेल्या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
९ मे २०२२- रुपये ६४,०१० प्रति किलो
१० मे २०२२ – रुपये ६२,९४० प्रति किलो
११ मे २०२२- रुपये ६२,०४० प्रति किलो
१२ मे २०२२- रुपये ६२,१८० प्रति किलो
१3 मे २०२२- रुपये ६०,१३० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.