⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

Gold-Silver Rate : सोने-चांदी घसरणीला ब्रेक, वाचा आज कितीने महागले?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ मे २०२२ । मागील काही दिवसापासून देशांतर्गत बाजारात (Share Market) पडझड सुरु आहे. तर दुसरीकडे रुपया देखील घसरत आहे. त्यामुळे गुंतवणूकदार धास्तावले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून गुंतवणूकदार सोन्याकडे (Gold) पुन्हा वळले आहे. दोन दिवसाच्या घसरणीनंतर आज गुरुवारी सोने चांदीच्या (Gold Silver Rate Today) भावात वाढ झाली आहे.

आज गुरुवारी जळगाव सराफ बाजारात सोने २४० रुपयाने वाढून प्रति तोळा ५२ हजार रुपयांवर गेला आहे. तर दुसरीकडे चांदी देखील महागली आहे. आज चांदी १४० रुपयांनी महागली आहे. आज १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ५२,०१० रुपये इतका आहे. तर चांदी ६२,१८० रुपये प्रति किलो इतकी आहे. दरम्यान, सोन्याच्या किमती या दिवसातून दोनदा जाहीर होतात. तसेच सोन्याची किंमत ही सोने अधिक दागिण्याच्या घडणावळीचा खर्च यावर अवलंबून असल्यामुळे भावात शहारानुसार तफावत आढळून येते.

मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीचे भाव सातत्याने घसरत आहे. काल बुधवारी सकाळच्या सत्रात सोने ३८० रुपयाने तर चांदी ९०० रुपयांनी स्वस्त झाली आहे. या आठवड्यात सोने २ वेळा स्वस्त तर २ वेळा महागले आहे. तर चांदी देखील २ वेळा स्वस्त तर २ वेळा महागली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्यात सोने ८५० ते ९०० रुपयांनी स्वस्त झाले. तर चांदी २६००० ते २७०० रुपयापर्यंत घसरली आहे.

दरम्यान, रशिया युक्रेन युद्ध दरम्यान ९ मार्चला सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५५,५५० रुपयावर गेला होता. तर चांदी ७३ हजार रुपयांवर गेली होती. त्यानंतर दोन्ही धातूंचे भाव कमी होत गेले. गेल्या दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली.

या आठवड्यात सोन्याचे दर किती बदलले
९ मे २०२२- रुपये ५२,५५० प्रति १० ग्रॅम
१० मे २०२२ – रुपये ५२,१५० प्रति १० ग्रॅम
११ मे २०२२ – रु ५२,७७० प्रति १० ग्रॅम
१२ मे २०२२- रु ५२,०१० प्रति १० ग्रॅम

या आठवड्यात चांदीचा दर किती बदलला
९ मे २०२२- रुपये ६४,०१० प्रति किलो
१० मे २०२२ – रुपये ६२,९४० प्रति किलो
११ मे २०२२- रुपये ६२,०४० प्रति किलो
१२ मे २०२२- रुपये ६२,१८० प्रति किलो

शुद्धता कशी ओळखावी
सोने खरेदी करायला गेल्यास २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यावर ९९९ लिहिलेले असेल. 23 कॅरेट सोन्यावर 995 आणि 22 कॅरेटवर 916 लिहिले आहे. 18 कॅरेटवर 750 लिहिले आहे तर 14 कॅरेटवर 585 लिहिले आहे. 999 शुद्धता असलेली चांदी सर्वात शुद्ध मानली जाते.