---Advertisement---
वाणिज्य

सलग दुसऱ्या दिवशी सोनं महागलं, चांदीचा दरही वाढला ; आता 10 ग्रॅम दर कुठे पोहोचला?

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जानेवारी २०२३ । सोने आणि चांदीच्या (Gold Silver Rate) किमतीत सुरु असलेली दरवाढ काही थांबण्याचे नाव घेत नाही. आज सोन्यासह चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज गुरुवारी, 12 जानेवारी रोजी भारतीय वायदा बाजारात सोने आणि चांदीमध्ये तेजी पाहायला मिळत असून मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सकाळी 10.30 वाजेपर्यंत सोन्याची किंमत 0.33 टक्क्यांच्या वेगाने व्यवहार करत आहे. तर चांदीचा भाव आज 0.82 टक्क्यांनी व्यवहार करत आहे.

gold silver 1 jpg webp

MCX वर आजचा काय आहे भाव ? Gold Silver

---Advertisement---

MCX वर सकाळी 10.30 वाजेपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 182 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 55,875 रुपयावर व्यवहार करत आहे. आज सोन्याचा व्यवहार 55,792 रुपयांपासून सुरू झाला होता. उघडल्यानंतर, किंमत एकदा 55,830 रुपयांवर गेली. पण, नंतर त्यात आणखी वाढ झाली. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर सोन्याचा भाव 8 रुपयांच्या वाढीसह 55,720 रुपयांवर बंद झाला.

तर दुसरीकडे आज चांदीचा दर तब्बल 556 रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे चांदीचा दर 68,529 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. आज चांदीचा व्यवहार 68,349 रुपयांवर सुरू झाला. किंमत एकदा 68,390 रुपयांवर गेली. परंतु, काही काळानंतर त्यात आणखी वाढ होऊन 68,529 रुपयांवर गेला. यापूर्वी काल शेवटच्या ट्रेडिंग सत्रात एमसीएक्सवर चांदीचा भाव 363 रुपयांनी घसरून 68,000 रुपयांवर बंद झाला.

आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर तेजीत आहे, तर चांदीचा दर घसरला आहे. सोन्याची स्पॉट किंमत आज 0.28 टक्क्यांनी वाढून $1,882.75 प्रति औंस झाली आहे. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात आजही चांदीचा दर घसरला आहे. चांदी 0.18 टक्क्यांनी घसरून 23.57 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---