⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | वाणिज्य | ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा दर काय? खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या..

ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदीचा दर काय? खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १ ऑगस्ट २०२३ । सोन्या आणि चांदीच्या दरांमध्ये चढउतार सुरूच आहे. दरम्यान, फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत सोन्यासह चांदीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाली होती. मात्र मे आणि जून महिन्यात सोने-चांदीचा भाव लक्षणीयरीत्या कमी झाला ज्यामुळे सर्वसामान्यांना खरेदीवर दिलासा मिळाला. परंतु दोन महिन्यात झालेल्या घसरणीची कसर जुलै महिन्यात भरून निघाली आणि सोन्याचा प्रति १० ग्रॅम भाव पुन्हा एकदा ६० हजार रुपयांच्या पातळीवर पोहोचला. अशा स्थितीत आता ऑगस्ट महिन्यात सोने-चांदीच्या किंमतीत दिलासा कायम राहणार की नवीन विक्रम नोंदवणार याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून असेल.

जळगावात काय आहे आजचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या २२ कॅरेट सोने विनाजीएसटी ५४,८५० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे. झाले. तर २४ कॅरेट सोन्याचा दर विनाजीएसटी ५९,९०० रुपयावर गेला आहे. दरम्यान, यापूर्वी कालच्या सकाळच्या सत्रात सोन्याचा दर ५९,७०० रुपयावर होता. त्यात आतापर्यंत २०० रुपयाची वाढ झालेली दिसून येत आहे. दुसरीकडे एक किलो चांदीचा भाव सध्या विनाजीएसटी ७५००० रुपयापर्यंत आहे. यापूर्वी काल सकाळी चांदीचा दर ७५ हजाराखाली होता.

मल्टी कमोडिटी एक्सचेंवरील दर?
आज मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंवर सकाळी ११ वाजेपर्यंत सोने १३८ रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे सोने ५९,४३० रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे चांदीचा दर ५०७ रुपयांनी घसरून ७४,९२० रुपयावर व्यवहार करत आहे.

दरम्यान, सराफा बाजारात सोन्याची खरेदी करताना जर तुम्हाला त्याच्या शुद्धतेवर शंका असेल किंवा तुम्हाला स्वतः सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुम्ही गूगल प्ले स्टोरवरून ‘BIS Care अ‍ॅप’ डाउनलोड करून सोन्याची शुद्धता तपासू शकता.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.