सोमवारी घसरण, मंगळवारी वाढ; जळगावमध्ये सोने-चांदीत तब्बल ‘इतक्या’ रुपयांची वाढ

मार्च 10, 2026 12:22 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मार्च २०२६ । सोने आणि चांदी दरात चढ उताराचे सत्र कायम आहे. जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी दोन्ही धातूंच्या दरात मोठी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी मंगळवारी बाजारपेठ उघडल्यावर पुन्हा सोन्यासह चांदी दरात वाढ झाल्याचं दिसून आले.

gold

जळगाव सराफा बाजारात आज सकाळी बाजार उघडल्यावर २४ कॅरेट सोने प्रति तोळा ७२१ रुपयांनी वाढून जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६५ हजार ६२४ रुपयांपर्यंत पोहोचले. यापूर्वी सोमवारी सोने १२३६ रुपयांची घट झाल्याने दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ६४ हजार ९०३ रुपयांपर्यंत खाली आले होते.

सोन्यासोबतच चांदी दरात वाढ झालीय. चांदी दरात सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा तब्बल १० हजार ३०० रुपयांची वाढ नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ८५ हजार ३१० रुपयांपर्यंत वधारले. यापूर्वी काल सोमवारी चांदी ८२४० रुपयांची घट नोंदवली गेल्याने दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ७५ हजार रुपयांपर्यंत घसरले होते.

दरम्यान, मध्य पूर्वेतील भू-राजकीय तणाव अद्याप पूर्णपणे निवळलेला नसल्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. अशा परिस्थितीत पारंपरिक सुरक्षित गुंतवणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीकडे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा वाढताना दिसत आहे

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now