सोनं-चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी खुशखबर; आठवड्याच्या पहिल्याच भाव घसरले
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ डिसेंबर २०२४ । जर तुम्ही सोनं-चांदी खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. गेल्या आठवड्यात सोन्यासह चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आता या आठवड्यात दोन्ही धातूंचे दर घसरणार की वाढणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यासह चांदी दरात घसरण दिसून आलीय. MCX वर सत्राच्या सुरुवातीला दोन्ही धातूंचे दर घसरले आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत सोन्याचा दर २११ रुपयांनी तर चांदीचा दर १५० रुपयांनी घसरलेला दिसून आला. यामुळे MCX वर सोन्याचा भाव ७६,९२५ रुपये प्रति तोळ्यावर ट्रेंड करत आहे. तर चांदी प्रति किलो ९०,८५४ रुपयावर व्यवहार करत आहे.
जळगावातही भाव घसरले;
गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने चांदीचे दर वधारले होते. मात्र आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूंमध्ये मोठी घसरण दिसून आली. जळगावात सध्या २४ कॅरेट सोन्याचा भाव विनाजीएसटी ७७,००० हजार रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे. तर चांदीचा दर ९२,००० रुपये प्रति किलोवर आहे.