जळगाव लाईव्ह न्यूज । ७ डिसेंबर २०२२ । भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)च्या पतधोरण बैठकीत केंद्रीय बँकेने मोठी घोषणा केली आहे. आरबीआयने यंदा पाचव्यांदा रेपो दरात वाढ केली आहे. आरबीआयने 35 बेसिस पॉइंटने वाढ केली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आंतरराष्ट्रीय बाजाराबरोबरच भारतीय वायदे बाजारात सोन्याच्या किमतीतही बदल झाला आहे. Gold Silver Rate Today
आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने आणि चांदीच्या फ्युचर्स किमतींमध्ये वाढ दिसून येत आहे. आज सकाळी MCX वर 24-कॅरेट शुद्ध सोन्याची फ्युचर्स किंमत 108 रुपयांनी (0.20 टक्के) वाढून 53868 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर चांदीची किंमत 226 रुपयांनी (0.35 टक्के) वाढून 65640 रुपयांवर व्यवहार करत आहे. प्रति किलो मात्र, वृत्त लिहिपर्यंत सोने 53,809 वर, तर चांदी 65,617 वर व्यवहार करत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची किंमत
आता जागतिक बाजाराबद्दल बोलायचे झाले तर आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर ०.४० डॉलरने (०.०२ टक्के) वाढून १७७१.६० डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे, तर चांदी ०.०५ डॉलरच्या वाढीसह २२.२३ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
सराफा बाजारात सोन्या-चांदीचा भाव
आता सराफा बाजाराबद्दल बोलूया, मंगळवारी सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. सराफा बाजारात सोने 473 रुपयांनी स्वस्त होऊन 53,898 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले, तर चांदी 1241 रुपयांनी घसरून 65,878 रुपये प्रति किलोवर बंद झाली.
आरबीआयच्या एमपीसी बैठकीत रेपो रेट वाढवण्यात आला आहे, त्यानंतर बाजाराचा ट्रेंड बदलला आहे. सध्या सोने आणि चांदी दोन्ही हिरव्या चिन्हात व्यवहार करत आहेत. सोन्याचा भाव विक्रमी उच्चांक गाठत आहे.