⁠ 
सोमवार, मे 6, 2024

सोने ५५ हजारांचा टप्पा गाठणार? वाचा आजचे सोने-चांदीचे भाव – ६ जानेवारी २०२२

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जानेवारी २०२१ । देशभरात कोरोनाने (Corona Virus) पुन्हा डोकंवर काढलं असून यामुळे पुन्हा लॉकडाउन(Lockdown) लागण्याची शक्यता गडद बनली आहे. त्याचे पडसाद सराफ बाजारावर दिसून येतोय. जळगाव सराफ बाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीचे (Silver Rate) भाव वधारले आहे. आज गुरुवारी १० ग्रॅम सोन्याच्या भावात ८० रुपयाची नोंद झाली. तर चांदीच्या एक किलोग्रॅम भावात किंचित २० रुपयाची वाढ झाली आहे. त्यापूर्वी काल बुधवारी सोने २४० रुपयाने वाढले होते तर चांदी ४९० रुपयांनी महागली होती. दरम्यान, आर्थिक विश्लेषकांच्या मतानुसार, आगामी काळात सोन्याच्या किंमती अधिक वाढण्याची शक्यता आहे.

आजचा जळगावातील भाव :
जळगाव सराफ बाजार पेठेत आज गुरुवारी २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७, १५० रुपयावर आला आहे. तर चांदीचा प्रति किलोचा भाव ६३,७०० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

सध्या ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे मौल्यवान धातूंची रिकव्हरी कमी प्रमाणात होईल. त्यामुळे आगामी काळात सोने-चांदीचे भाव पुन्हा वाढणार असल्याची शक्यता दमानी यांनी व्यक्त केली आहे. जळगाव सराफ बाजारात देखील सोने आणि चांदीचे दर एका विशिष्ठ पातळीवरून वरखाली होत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोने आणि चांदीच्या वाढ दिसून आली होती.

ओमिक्रॉनचं सावट, 55 हजारांचा टप्पा!
ओमिक्रॉन विषाणूचा प्रादूर्भाव, फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदरात वाढ, डॉलरचा सावरलेला भाव, कच्चा इंधनाच्या भावांतील चढ-उतारांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर जाणविण्याची शक्यता असल्याचे कमोडिटी मार्केटच्या विश्लेषकांनी म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्ष 2022 मध्ये बाजारभावात सोने-चांदी उजळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जागतिक स्तरावर कोविड बाधितांच्या आकड्यात होणारी वाढीमुळे बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. सुरक्षित गुंतवणुकीचे साधन म्हणून सोने-चांदीला प्राधान्यात वाढ होत आहे. त्यामुळे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 55,000 हजारांचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला. ३१ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे.

सोन्याची शुद्धता कशी तपासायची?

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.

हे देखील वाचा :