घसरणीनंतर सोने-चांदी पुन्हा महागली ; आताच दर पहा काय आहे?..

जून 2, 2023 11:16 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ०२ जून २०२३ । जून महिन्याच्या दुसऱ्या दिवशी सोने-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price) काय घडामोड होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अशातच आज सोन्यासह चांदीच्या किमतीत वाढ झालेली दिसून आली. यामुळे सोन्याचा दर पुन्हा 60 हजारावर गेला आहे. तर दुरीकडे चांदीचा दर 73 हजाराच्या उंबरवठ्यावर आला आहे. Gold Silver Rate Today

gold silver 2 jpg webp

मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत सोन्याचा दर 311 रुपयांनी वाढला आहे. यामुळे सोने 60,230 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किमतीत 270 रुपयाची वाढ झाली आहे. यामुळे एक किलोचा दर 72,864 रुपयावर व्यवहार करत आहे.

गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या मे महिन्याच्या सुरुवातीलाच सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली होती. मात्र त्यांनतर पंधरवाडामध्ये घसरण पाहायला मिळाली. जून महिन्यातही सोने आणि चांदीचा दर उसळी घेणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. कालच्या सकाळच्या सत्रात दोन्ही धातूंच्या किमती घसरल्या होत्या मात्र आज वाढ झालेली दिसून आली.

जळगाव सुवर्णनगरीतील सोन्याचा दर?
जळगाव सुवर्ण नगरीत सध्या सकाळच्या सत्रात 22 कॅरेट सोन्याचा दर 55,700 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 60,600 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. चांदीचा एक किलोचा दर 72,200 रुपये इतका आहे.

वरील सोन्या-चांदीच्या किमतीवर जीएसटी आणि दागिने बनवण्याचे शुल्क लागू नाही.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now