⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

या आठवड्यात 1200 रुपयांनी स्वस्त झाली चांदी, सोने? वाचा ताजे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । गेल्या काही दिवसापासून सोने आणि चांदी (Gold Silver rate) च्या भावात चढ-उतार दिसून आला आहे. जळगाव सराफ बाजारात या चालू आठवड्यात सोन्याच्या भावात फारसा बदल दिसून आलेला नाही. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आली आहे. या आठवड्यात चांदी १२०० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

आज जळगाव सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ४८,९७० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर चांदीचा ६२,१६० रुपये प्रति किलो इतका झाला आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

काल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने भावात ८० रुपयाची तर चांदीच्या भावात ७०० रुपयाची घसरण झाली होती . यापूर्वी गुरुवारी सकाळच्या सत्रात सोने किंचित ४० रुपयांनी स्वस्त झाले होते तर चांदी १४० रुपयांनी महागली होती. दरम्यान,आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.

गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात ३०० रुपयापर्यंची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण दिसून आली. तर चालू आठवड्यात देखील सोन्याच्या किंचित २०० रुपया पर्यंतची घट दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावात १२०० रुपयाची घट झाली आहे. आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे सोन्याच्या भावात चढ-उताराची स्थिती राहील असा अंदाज गुंतवणूक तज्ज्ञांनी वर्तविलेला आहे.

सोन्याच्या खरेदी करताना सावधान?

केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाने BIS-केअर मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे सोनं खरंच किती शुद्ध आहे, याबाबतची माहिती मिळणार आहे. त्यामुळे सोन्यात इतर धातूंच मिश्रण करुन लुबाडणाऱ्यांना चांगलाचा धडा मिळणार आहे. सोनं कितपत शुद्ध आहे, याची खरंच योग्य माहिती दिली तर या अ‍ॅपला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

चालू आठवड्यातील दर

सोने दर :
३१ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,७३० रुपये प्रति तोळा
०१ फेब्रुवारी (मंगळवार) ४८,८०० रुपये प्रति तोळा
०२ फेब्रुवारी (बुधवारी) ४९,०९० रुपये प्रति तोळा
०३ फेब्रुवारी (गुरुवार) ४९,०५० रुपये प्रति तोळा
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा
०५ फेब्रुवारी (शनिवार) ४८,९७० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
३१ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६२,४६० प्रति किलो
०१ फेब्रुवारी (मंगळवार) चांदीचा दर ६२,४१० प्रति किलो
०२ फेब्रुवारी (बुधवारी) चांदीचा दर ६२,८०० प्रति किलो
०३ फेब्रुवारी (गुरुवार) चांदीचा दर ६२,९४० प्रति किलो
०४ फेब्रुवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो
०५ फेब्रुवारी (शनिवार) चांदीचा दर ६२,१६० प्रति किलो

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :