⁠ 
सोमवार, मे 6, 2024

खुशखबर..सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण, वाचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जानेवारी २०२१ । जळगाव सराफ बाजारात काल आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात वाढ नोंदविली गेली होती. मात्र आज दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीचे दर मोठ्या किंमतीने घसरले आहे. आज मंगळवारी सोने ४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. तर दुसरीकडे चांदी ९४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आजच्या घसरणीनंतर सोने ४९ हजाराच्या खाली आले आहे.

आजचा सोने-चांदीचा दर?
आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याचा दर ४८,८३० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६३,१९० रुपये इतके आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.

ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचे दर हे ५६ हजार २०० च्या आसपास पोहोचले होते. मात्र, सार्वकालिक उच्चांकावरून सोन्याच्या दरात ७ हजाराहून अधिकने घसरण झाल्याने नागरिकांनी सोने खरेदीची एक चांगली संधी मिळाली आहे. गेल्या वर्षभरात (२०२१) सोन्याच्या दरात मोठा बदल झालेला दिसून आला. १ जानेवारी २०२१ रोजा १० ग्रॅम सोन्याचा दर ५१,३३० इतका होता. तर दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा दर ६९,७०० रुपये इतका होता. विशेष म्हणजे 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत 4 टक्क्यांनी घसरण झाली आहे.

सध्या भारतात ओमिक्रॉनसह कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. राज्यात देखील कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. आगामी काळात वाढत्या रुग्ण संख्येने पुन्हा लॉकडाऊन लागण्याच्या भीतीने गुंतवणूकदार धास्तावले आहे. यावर्षी २०२२ मध्ये सोने ५५ हजारांच्या पातळीपुढे जाणार असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.

गेल्या आठवड्यातील सोने चांदीचे दर?

२७ डिसेंबर (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,२५० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तसेच एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये असा होता. २८ डिसेंबर (मंगळवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१९० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,७६० रुपये इतका नोंदविला गेला. २९ डिसेंबर (बुधवार) २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,१७० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,९८० रुपये इतका नोंदविला गेला. ३० डिसेंबर (गुरुवारी) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९६० रुपये प्रति तोळा एवढे नोंदले गेले. तर एक किलो चांदीचे दर ६३,२९० रुपये इतका नोंदविला गेला. ३१ डिसेंबर (शुक्रवार) २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर ४९,०१० रुपये इतके आहे. तर चांदी प्रति किलो ६२,६२० रुपये इतके आहे.

हे देखील वाचा :