⁠ 
शनिवार, एप्रिल 27, 2024

स्वस्तात खरेदीची संधी.. सोने-चांदीच्या भावात पुन्हा मोठी घसरण

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ जानेवारी २०२२ । आज सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर बाजारात सध्या तेजी पाहायला मिळत आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने (Gold Rate) आणि चांदीच्या (Silver Rate) भावात मोठी घसरण दिसून आलीय. आज जळगाव सराफ बाजारात १० ग्रॅम सोन्याच्या दरात ३०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदी प्रति किलो ९४० रुपयांनी स्वस्त आली आहे. यापूर्वी गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोने ९७० रुपायांनी तर चांदी २१७० रुपयांनी स्वस्त झाली होती.

गेल्या दोन सत्राच्या घसरणीनंतर सोने आणि चांदी खरेदी उत्तम संधी आहे. आज सोने ३०० रुपयांनी घसरुन ४८,७३० रुपये प्रति तोळ्यावर आला आहे. तर चांदी ९४० रुपयांनी घटून ६२,४६० रुपये प्रति किलोवर आली आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे सोन्याच्या दरात काही हजारांची वाढ दिसून येते. दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात 4 ते 5 हजारांची वाढ दिसून येते.

गेल्या अनेक दिवसापासून वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या भावामध्ये गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ब्रेक लागला. गेल्या आठवड्याचा विचार केल्यास सोन्याच्या दरात किंचित ३०० रुपयापर्यंची घसरण दिसून आली. तर चांदीच्या दरात जवळपास ३ हजार रुपयाची घसरण दिसून आली. दरम्यान, सोने खरेदीकडे वाढता कल तसेच आगामी लग्नसराई व धार्मिक कार्यक्रमांमुळे अर्थतज्ज्ञांची सोने 55 हजारांचा टप्पा पार करणार असल्याचे भाकीत व्यक्त केले होते.

आज सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. आज पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारामन वर्ष २०२१-२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करतील.२०२२ वर्षासाठी सर्वेमध्ये जीडीपी ९ ते ९.५ टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला जाण्याची शक्यता आहे. महागाई वाढण्याची चिन्ह देखील या सर्वेत व्यक्त केली जाऊ शकतात.

गेल्या आठवड्यातील असे होते दर?

सोने दर :
२४ जानेवारी (सोमवार) रोजी २४ कॅरेट सोन्याचे दर ४९,३८० रुपये प्रति तोळा
२५ जानेवारी (मंगळवार) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२६ जानेवारी (बुधवारी) ४९,७०० रुपये प्रति तोळा
२७ जानेवारी (गुरुवारी) ५०,००० रुपये प्रति तोळा
२८ जानेवारी (शुक्रवार) ४९,०३० रुपये प्रति तोळा

चांदी दर:
२४ जानेवारी (सोमवार) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२५ जानेवारी (मंगळवार) चांदीचा दर ६५,४६० प्रति किलो
२६ जानेवारी (बुधवारी) चांदीचा दर ६६,३३० प्रति किलो
२७ जानेवारी (गुरुवारी) चांदीचा दर ६५,५७० प्रति किलो
२८ जानेवारी (शुक्रवार) चांदीचा दर ६३,४०० प्रति किलो

सोन्याची शुद्धता कशी तपासायची
24 कॅरेट शुद्ध सोन्यावर 999 लिहिले आहे.
22 कॅरेटच्या दागिन्यांवर 916 लिहिले आहे.
21 कॅरेट सोन्याच्या ओळखीवर 875 लिहिले जाईल.
18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिले आहे.
14 कॅरेटच्या दागिन्यांवर 585 लिहिले आहे.

सूचना : सदर सोने आणि चांदीने दर हे ऑनलाईन आहे. तरी अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.

हे देखील वाचा :