खरेदीची चांगली संधी! सोने 50 हजारांच्या जवळ, चांदी 700 रुपयापर्यंत घसरली

नोव्हेंबर 3, 2022 11:28 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ नोव्हेंबर २०२२ । दिवाळीनंतर सोने आणि चांदीच्या (Gold Silver Price) किमतीत वाढ झालेलं दिसून आलीय. मागील काही सत्रात दोन्ही धातूंचे दर वाढताना दिसून आले. मात्र कमकुवत जागतिक संकेतांमुळे आज भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. त्यामुळे ग्राहकांना खरेदीची मोठी संधी आहे. आजच्या घसरणीनंतर सोने 50 हजारांच्या जवळ आले आहे. तर चांदी 700 रुपयापर्यंत घसरली आहे. Gold Silver Rate Today

gold silver rate 2 jpg webp

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरील आजचा सोने-चांदीचा दर?
गुरुवारी, वायदे बाजारात सकाळी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 286 रुपयांनी घसरून 50,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. सोन्याचा दर आज 50,500 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​उघडला गेला. एकदा उघडल्यानंतर तो 50,280 रुपयांपर्यंत गेला. पण काही काळानंतर तो सावरला आणि 50,320 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.

दुसरीकडे मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर आज 700 रुपयापर्यंतची घसरण झाली आहे. त्यामुळे आज चांदीचा एक किलोचा दर 58,100 रुपयांवर आला आहे. चांदीचा भाव 58,441 रुपयांवर उघडला होता. एकदा किंमत 57,853 रुपयांवर गेली. पण नंतर किमतीत थोडी सुधारणा झाली आणि दर 58,100 रुपये झाला.

जळगाव सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव 46,500 रुपयापर्यंत आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,900 रुपये इतका आहे. यापूर्वी हा दर 50,800 रुपये इतका होता. दुसरीकडे चांदी दर सध्या 59,300 रुपयापर्यंत आहे. यापूर्वी चांदीचा दर 58,800 रुपयापर्यंत होता. म्हणजेच चांदी एकाच दिवसात 500 ते 600 रुपयांनी वधारली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now