बातम्या

सलग दुसऱ्या दिवशी जळगावची कोरोना रुग्ण संख्या शंभरच्या आत !

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२१ । जळगाव जिल्ह्यात मे व जून महिन्यात कोरोनाचा संसर्ग बऱ्यापैकी नियंत्रणात येत असल्याची चिन्हे आहेत. दीड महिन्यापासून सातत्याने रुग्णसंख्या घटत असून मृत्यूदरही कमी होत आहे. जिल्ह्यात आज शुक्रवारी पुन्हा नवीन कोरोना बाधितांचा आकडा शंभराच्या आत नोंदला गेला असून ही जिल्ह्यातील संसर्गाच्या दृष्टीने दिलासादायक बाब आहे. आज शुक्रवारी केवळ ८० रुग्णांची नोंद झाली, तर त्यापेक्षा तिप्पट म्हणजे २४२ रुग्ण बरे झाले. दिवसभरात केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.

corona

जळगाव शहर नियंत्रणात

सर्वाधिक रुग्णसंख्या व बळी नोंदल्या गेलेल्या जळगाव शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात येत असून बरे होणारे वाढत आहेत. शहरात शुक्रवारी अवघ्या ०७ नव्या रुग्णांची नोंद झाली. शहरातील सक्रिय रुग्ण आता दोनशेच्या टप्प्यात आहेत.

आजची आकडेवारी

जळगाव ग्रामीण ०७, जळगाव ग्रामीण ०३, भुसावळ ०६, अमळनेर, ०३, चोपडा-०5, पाचोरा-०८, भडगाव-००, धरणगाव-०१, यावल-०३, एरंडोल-०४, जामनेर-०४, रावेर-०४, पारोळा-०४, चाळीसगाव-२५, मुक्ताईनगर-०२, बोदवड-०१ आणि इतर जिल्ह्यातील ०१ असे एकुण ८० बाधित रूग्ण आढळून आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button