जळगाव लाईव्ह न्यूज । २७ ऑक्टोबर २०२१ । दिवळीपर्यंत सोन्याचे भाव ५७ ते ६० हजार जाणार असा अंदाज अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या प्रमाणे दसऱ्यानंतर सोन्याच्या भावांत कायम वाढ सुरु आहे. मात्र आज अनेक दिवसांनी सोन्याच्या दरात घसरण झालेली पहायला मिळाली. जळगाव सराफ बाजारात आज प्रति १० ग्रॅम सोन्याच्या भावात ४०० रुपयाची घसरण झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावातही आज मोठी घसरण पाहायला मिळाली. आज चांदीचा प्रति किलोचा भाव ११८० रुपयाने घसरला आहे. त्यापूर्वी काल मंगळवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम ४१० रुपयांची तर चांदीच्या भावात प्रति किलो ४९० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती.
आजचा सोने आणि चांदीचा भाव
जळगाव सराफ बाजारात आज बुधवारी २२ कॅरेट सोन्याचे दर ४६,२३० रुपये प्रति तोळा इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,९३० रुपये प्रति तोळा इतका आहे. दुसरीकडे चांदीचा प्रति किलोचा भाव ६६,५१० रुपये इतका आहे. दरम्यान, सराफ व्यवसायिकांकडून सोन्यावर जीएसटी, आयात शुल्क आणि घडणावळ शुल्क आकारले जाते. त्यामुळे दहा ग्रॅम सोन्याचा दागिना खरेदी करताना प्रत्यक्ष बाजार भावात ४ ते ५ हजारांची वाढ होते.
दरम्यान, गेल्या सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव प्रति तोळा ४७ हजाराच्या घरात होता. दसऱ्यापर्यंत सोन्याच्या भावात आणखी घट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे देशभरातील विविध शहरांसह जळगाव सराफ बाजार पेठेत ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीचं पासून सोन्याचा भाव वाढू लागला आहे. १ ऑक्टोबर २०२१ च्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या भावात ७६० रुपयाची वाढ नोंदविली गेली होती. त्यामुळे त्यादिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,४१० रुपयांवर गेला होता.
ऐन नवरात्रीत देखील सोन्याच्या भावात वाढ होत राहिली. नवरात्री सुरु झाली त्यादिवशी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ४७,९२० रुपये इतका होता. तर नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी तो ४९ हजार ०४० रुपयांवर पोहोचला. तरीही दिवाळीनिमित्त सोन्याचे दागिने खरेदी करायची इच्छा असलेल्यांना सध्या चांगली संधी असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे चांदीच्या भावात देखील मोठी वाढ झालीय. जळगाव सराफ बाजारात गेल्या काही दिवसापासून चांदीचा भावात सतत वाढ होत राहिली. १ ऑक्टोबर ला चांदीचा प्रति किलोचा भाव ६१,०१० इतका होता. तर नवरात्रीच्या दिवशी चांदीचा प्रति किलोचा भाव ६२,६९० रुपये इतका होता. तो नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ६४,३६० प्रति किलोवर पोहचला. नवरात्रीत देखील चांदी महागली असल्याचे दिसून आले.
दरम्यान, गेल्या दिवाळीत सोन्याच्या प्रति तोळ्याचा भाव ५२,१२० इतका होता. त्यामुळे सोने रेकॉर्ड पातळीपेक्षा ३१९० रुपयांनी स्वस्त मिळत आहे. परंतु दिवाळी ते डिसेंबरपर्यंत सोन्याची किंमत ५७ हजार रुपयांपासून ६० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते. जोपर्यंत चांदीचा प्रश्न आहे, त्यातही मोठी वाढ होऊ शकते. बहुतेक व्यापाऱ्यांचा असा विश्वास आहे की, दिवाळीपर्यंत किंवा वर्षाच्या अखेरीपर्यंत चांदीचे दर ७६,००० ते ८२,००० रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतात.
गेल्या आठवड्यातील सोने दर?
सोमवारी (१८ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,३२० होते, त्यात ७२० रुपयाची घसरण झाली होती. मंगळावारी (१९ ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे दर ४८,४०० इतका होता. त्यात किरकोळ ८० रुपयाची वाढ झाली होती. बुधवारी (२० ऑक्टोबर) २४ कॅरेट सोन्याचे (Gold) दर १० ग्रॅममागे ४८,३९० रुपये इतका आहे. त्यामध्ये १० रुपयाची किंचित घट झाली होती. गुरुवार (२१ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,६१० रुपयाने इतका आहे. शुक्रवार (२२ ऑक्टोबर) प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८,५२० रुपयाने इतका आहे.