---Advertisement---
जळगाव जिल्हा वाणिज्य

अर्थसंकल्पाचा चमत्कार! सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदी दरात झाली घसरण..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जुलै २०२४ । काल मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील सीमा शुल्क कपातीचा निर्णय घेण्यात आला. त्याचा मोठा फायदा सराफा बाजाराला झाला. मंगळवारचा दिवस सुवर्णनगरी जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांसह सुवर्णप्रेमींसाठी खूशखबर घेऊन येणारा ठरला. सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे.

gold silver jpg webp

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्यूटी १५ टक्क्यांवरून ६ टक्के केली. कस्टम ड्यूटी ९ टक्क्यांनी घटल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. मंगळवारी सोने दरात तब्बल २५०० हजारांहून अधिकची घसरण झाली. तर चांदी देखील २००० हजारापर्यंत घसरली.

---Advertisement---

अर्थसंकलपापूर्वी जळगावात सोने ७३५०० तर चांदी ९०००० रुपये होती. मात्र अर्थसंकल्पानंतर सोने ७०,७०० रुपये तर चांदीचे दर ८८००० रुपयापर्यंत आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

दरम्यान, अर्थसंकल्पानंतर सलग दुसऱ्या दिवशी ही सोन्यात घट नोंदवली गेली आहे. जळगावात सोने-चांदी दरात किंचित घट झाली आहे. या घडामोडीनंतर भविष्यातील दराबाबत संभ्रम असून आता दर वाढतील की घटतील हे आता सांगण कठीण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---