⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

Gold Silver Today : नवरात्री आधीच सोने-चांदी महागली, वाचा आजचे भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२२ । शुक्रवार, 23 सप्टेंबर रोजी भारतीय वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किमती वाढल्या आहेत. सोन्याने आज उसळी मारून 50,000 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे, तर चांदीचा भावही 58,000 रुपयांच्या वर गेला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याची किंमत सुरुवातीच्या व्यापारात 0.29 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचप्रमाणे, चांदीची किंमत देखील कालच्या बंद किंमतीपेक्षा 0.30 टक्क्यांनी वर जात आहे. Gold Silver Price Today

आजचा MCX वरील भाव:
शुक्रवारी सकाळी 9:10 वाजता 24 कॅरेट शुद्धतेचे MCX सोने 29 रुपयांनी वाढून 50,029 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहे.तर दुसरीकडे चांदीचा दर 173 रुपयांनी वाढून 58,200 रुपये किलो झाला आहे. आज चांदीचा व्यवहार 58,050 रुपयांपासून सुरू झाला. काही काळानंतर किंमत वाढली आणि 58,200 रुपयांवर व्यवहार सुरू झाला. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगावमधील दर
येत्या काही दिवसावर नवरात्रोत्सव सुरु होत आहे. अशातच जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या भावात वाढ होताना दिसून येतेय. जळगाव सराफ बाजरात सध्या 22 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 46,260 रुपये इतका आहे. यापूर्वी तो 46,260 रुपये होता. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव जवळपास 50,700 रुपये इतका आहे. तर यापूर्वी 50,500 रुपये इतका होता. मात्र चांदीच्या भावात घसरण दिसून येतेय. सध्या चांदीचा एक किलोचा भाव जवळपास 57,500 रुपये आहे तो यापूर्वी 57,800 रुपये इतका आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.
२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.
२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.
१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.
१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.