जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२१ । आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे. आज सोमवारी जळगाव सराफ बाजारात सोने प्रति १० ग्रॅम १० ते २० रुपयाने स्वस्त झाले आहे. तर चांदी ४२० रुपयाने स्वस्त झाली आहे.
जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्यात सोन्या च्या भावात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. सोने १००० रुपयापर्यंत वधारले तर चांदी किंचित घसरण झाल्याचे दिसून आले.
कोरोना लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल होत आहेत. त्यामुळे बाजारपेठेतील व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. त्यामुळे सोने चांदीचे भाव वेगाने बदलत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सराफ व्यावसायिकांनी सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सोने आणि चांदीच्या भावात वाढ होत आहे.
ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याचा भाव ५६,२०० रुपये प्रती १० ग्रॅम इतका वाढला होता. मात्र मागील काही महिन्यात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचा भाव गडगडला.
दरम्यान, १६ जूनपासून देशभरात हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी झाली होती. त्यानुसार आता सोन्याची विक्री करताना त्यावर हॉलमार्क असणे बंधनकारक आहे. मात्र, या सगळ्याविषयी ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले आहे.
आजचा जळगावातील सोन्याचा दर
२४ कॅरेट १ ग्रॅम सोन्याचा भाव ४८२६ रुपये इतका आहे तर १० ग्रॅम ४८,२६० रुपये आहे.
आजचा जळगावातील चांदीचा भाव
चांदीचा एक किलोचा भाव ६३,१७० रुपये इतका आहे.