जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑक्टोबर २०२२ । आज आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय वायदा बाजारातील सोन्या-चांदीच्या (Gold Silver) दरांमध्ये बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोबतच चांदीची घसरली आहे. दिवाळी आणि धनत्रयोदशीमुळे दोन्ही मौल्यवान धातूंना चांगली मागणी असते. परंतु मागील सत्रात घसरण होत असल्याने खरेदीची ही चांगली संधी आहे. Gold Silver Price Today

MCX वर आज सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
आज बुधवारी, 19 ऑक्टोबर रोजी सोन्या-चांदीने एमसीएक्सवर घसरणीसह व्यवहार सुरू केला. सकाळी 10.30 वाजेपर्यंत प्रति 10 ग्रॅम सोने 120 रुपयांनी घसरले. त्यामुळे सोने 50,294 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे सुरुवातीच्या व्यवहारात आज चांदीच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली. मात्र त्यानंतर घसरण झाली. सकाळी 10.30 वाजेपर्यंत चांदी 100 रुपयांनी घसरून 56,250 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
जळगाव सुवर्णनगरीत सोन्याच्या किमतीत घसरण दिसून येतेय. मात्र, चांदी काहीशी वाढलेली दिसून येतेय. सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,440 रुपयांपर्यंत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 50,700 रुपये इतका आहे. यापूर्वी 24 कॅरेट सोन्याचा भाव 51000 रुपये प्रति तोळा इतका होता. दरम्यान, दुसरीकडे सध्या चांदीचा प्रति किलोचा दर 57,000 रुपये इतका आहे. यापूर्वी चांदीचा दर 56,200 रुपये इतका होता. जळगावात गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 900 ते 1000 रुपयाची घसरण दिसून आली. तर चांदीच्या भावात 3500 रुपयापर्यंतची घसरण दिसून आली.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
धनत्रयोदशीला सोने खरेदी करताना रहा सावध
दरम्यान, दिवाळी आता अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपली आहे. धनत्रयोदशीच्या निमित्ताने देशात मोठ्या प्रमाणात सोने-चांदी (Gold-Silver) खरेदीसाठी सराफा बाजारात खरेदीची झुबंड उडणार आहे. अशावेळी तु्म्ही सावध नसाल तर तुमची सोने खरेदीत फसवणूक होऊ शकते.












