दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या किमतीत विक्रमी घसरण ; जळगावात या आठवड्यात झाली ‘इतकी’ घसरण

ऑक्टोबर 15, 2022 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ ऑक्टोबर २०२२ । दिवाळीपूर्वी सोने खरेदी करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्हीही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल (Gold Silver Price), तर तुमच्यासाठी स्वस्त सोने खरेदीची संधी आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणेजच शुक्रवारी सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण दिसून आलीय. सोने जवळपास 600 रुपयांनी तर चांदी तब्बल 1800 रुपयांनी घसरली. जळगाव सुवर्णनगरीतही सोने चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे. Gold Silver Price Today

gold silver jpg webp

MCX वर काय आहे सोने चांदीचा भाव?
बाजार बंदमुळे शनिवार आणि रविवार असे दोन दिवस दर जाहीर होत नाही. MCX वर सध्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 50,280 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. यापूर्वी सोमवारी सोन्याचा दर 51,500 रुपयापर्यंत होता. मात्र मागील काही सत्रात चढ-उतार दिसून आली. परंतु काल शेवटच्या दिवशी मोठी घसरण झाली. त्याचवेळी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये चांदीचा प्रति किलोचा भाव 55,290 रुपये इतका आहे. सोमवारी चांदीचा भाव 59,200 रुपयापर्यंत होता. मात्र या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. दरम्यान, उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

जळगाव सुवर्णनगरीतील भाव?
दरम्यान, जळगाव सुवर्णनगरीत या आठवड्यात सोन्याच्या भावात मोठी घसरण झाल्याचे दिसून येतेय. सध्या 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,700रुपये इतका आहे. 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,000 रुपये इतका आहे. यापूर्वी सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 52,000 हजारापर्यंत होता. म्हणजेच या आठवड्यात सोन्याच्या किमतीत जवळपास 900 ते 1000 रुपयाची घसरण झाली. दुसरीकडे सध्या चांदीचा भाव 57,500 रुपयापर्यंत आहे. सोमवारी चांदीचा भाव 61,000 रुपया पर्यन्त होता. या आठवड्याच्या चांदीच्या भावात 3500 रुपयापर्यंतची घसरण झाली आहे.
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :
तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक ‘verify HUID’ द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now